मोठ्ठी भरती : महानिर्मिती मध्ये 0800 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू! | मासिक वेतन – 35,555 रूपये

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

नोकरी शोधताय? महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी म्हणजेच महानिर्मिती येथे तंत्रज्ञ 3 पदांची रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 0800 पदे भरली जात आहेत. १८ ते ३८ वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्र राज्य मध्ये कुठेही नियुक्ती दिली जाऊ शकते.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

उमेदवारांची माहिती संगणकावर एकत्रित करण्यात येणार असल्याने परिक्षेसाठी विहित केलेला नमूना अर्ज व माहिती http://www.mahagenco.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेतस्थळावर दिनांक २६.११.२०२४ पासून उपलब्ध राहील. सदर अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक २६.१२.२०२४ रोजी २३:५९ वाजेपर्यंतच राहील. उमेदवारांचे ऑनलाईन भरलेले अर्जच स्विकारले जातील. अन्य कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांनुसार तसेच जाहिरातीमध्ये दर्शविण्यात आलेल्या रिक्त जागांनुसार सामाजिक आणि समांतर आरक्षण विचारात घेऊन निवड सूची यादी तयार करण्यात येईल. सदरची निवडसूची कंपनीच्या संकेतस्थळावर उमेदवारांच्या माहितीकरिता उपलब्ध करुन देण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांनी सिस्टीम जनरेटेड अर्जामध्ये दर्शविलेली त्यांची शैक्षणिक अर्हता, वय, जात, उन्नत-प्रगत गटात मोडत नसणे, प्रकल्पग्रस्त, खेळामधील प्राविण्य, शारिरीक बाधित / व्यंगत्वाचे प्रमाण, माजी सैनिक, प्रगत कुशल प्रशिक्षण, भूकंपग्रस्त, शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण, अनाथ प्रमाणपत्र इत्यादी सिध्द करणे हे सर्वस्वी उमेदवारांची जबाबदारी राहिल. यापैकी कोणतीही बाब उमेदवार सिध्द करु न शकल्यास त्याची निवड रद्द करण्यात येईल. तसेच सदर बाबतीत कोणत्याही प्रकारचा पत्र व्यवहार विचारात घेतला जाणार नाही. दस्तऐवज सादर करण्याच्या कालावधीमध्ये उमेदवाराने दस्तऐवज सादर न केल्यास त्याची उमेदवारी रद्द करण्यात येईल. 26 डिसेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक आहे.


error: Content is protected !!