Mahanirmiti Technician Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या महाराष्ट्रातील सर्व विद्युत केंद्रातील रिक्त पद संख्या आणि सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन 0800 पदे रिक्त भरावयाची आहेत. तरी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील रिक्त पदांकरीता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. PDF जाहिरात मधील रिक्त असणारी पदे, भरती बद्दलची आवश्यक माहिती, PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Mahanirmiti Technician Bharti 2024 : Considering the number of vacant posts in all power stations of Maharashtra State Electricity Generating Company and social and parallel reservation, 0800 posts are to be filled. However, applications are being invited from eligible candidates for the vacant posts in Maharashtra State Electricity Generating Company online in the prescribed format.
◾भरती विभाग : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महानिर्मिती) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : राज्यातील मोठ्या विद्युत विभागात नोकरी मिळवण्यासाठी खूप मोठी संधी.
◾एकूण पदे : 0800 जागा.
◾पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 34,555 रूपये वेतन दिले जाणार आहे.
◾पूर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : 26 नोव्हेंबर 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष पर्यंत.
◾भरती कालावधी : कायमस्वरुपी (Permanent) नोकरीची संधी.
◾पदाचे नाव : तंत्रज्ञ – 3
◾व्यावसायिक पात्रता :
संबंधित व्यवसायातील शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आय.टी.आय.) नियमित (रेग्युलर) कोर्स उत्तीर्ण राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र (NCTVT)/(MSCVT). सदर पदासाठी खालील व्यवसाय (ट्रेड) विहित करण्यात आले आहेत. १) इलेक्ट्रीशियन (वीजतंत्री) २) वायरमन (तारतंत्री) ३) मशिनिस्ट (यंत्र कारागीर) ४) फिटर (जोडारी) ५) इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स ६) इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम ७) वेल्डर (संधाता) ८) इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक ९) ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्यूशन कंट्रोल इक्वीपमेंट १०) बॉयलर अटेंडन्स ११) स्विच बोर्ड अटेंडन्स १२) स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर स्टिम टर्वाइन ऑपरेटर १३) ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हँडलॉग इक्वीपमेंट १४) ऑपरेटर कम मेकॅनिक (पाँवर प्लॅन्ट) या शासनमान्य आय. टी. आय./ NCTVT/ MSCVT उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र. (Jobs in Maharashtra)
◾उमेदवार हा भारतीय नागरीक व त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
◾ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर ऑनलाईन परीक्षा अंतिम निवड यादी प्रसिध्द करताना / केल्यानंतर उमेदवाराकडून वरील पर्याय निवडताना त्रुटी आढळून आल्यास, सदरील उमेदवाराच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
◾तंत्रज्ञ-३ पदासाठी असणारी किमान शैक्षणिक अर्हता आणि पात्रता धारण करणाऱ्या व ऑनलाईन परिक्षेस पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना या पदांसाठी घेण्यात वेणाऱ्या परिक्षेची रुपरेषा, वेळापत्रक, परिक्षा केंद्र, बैठक क्रमांक इत्यादी बाबतची माहिती महानिर्मिती कंपनीच्या www.mahagenco.in या संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध करुन देण्यात येईल.
◾उमेदवारांना ऑनलाईन परिक्षेसाठी नियोजित स्थळी व वेळी स्वःखर्चाने उपस्थित रहावे लागेल व तसेच उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेली माहिती, परीक्षा केंद्रात सिध्द करु न शकल्यास त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
◾उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान पूर्णपणे अवगत असणे आवश्यक आहे याची उमेदवारांनी विशेष नोंद घ्यावी.
◾उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा. तसेच उमेदवाराजवळ महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असल्याबाबतचे स्वतःच्या नावे असलेले अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे आवश्यक आहे.
◾सदर भरती प्रक्रिया पूर्णतः वा अंशतः रह करण्याचे अथवा त्यात बदल करण्याचे अधिकार महानिर्मिती कंपनी राखून ठेवत आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 26 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.