
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा (ऑनलाईन अर्ज अजून सुरू नाहीत.) |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महाराष्ट्र राज्य वीज पारेषण कंपनी मध्ये निम्नस्तर लिपीक (वित्त व लेखा) ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये 0260 पदे भरली जात आहेत. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत. 10 मार्च 2025 दरम्यान ऑनलाईन अर्ज सुरू होतील. नियम व अटी : जाहिरातीत नमुद केलेल्या पदासाठी अर्ज करतेवेळी उमेदवाराने विहित शैक्षणिक अर्हता, वय, महाराष्ट्र अधिवास, जात, उन्नत-प्रगत गटात मोडत नसणे, महिला, खेळामधील प्राविण्य, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, शारिरिक बाधित /व्यंगत्वाचे प्रमाण वगैरे त्यास लागू असलेल्या बाबी धारण केलेल्या आहेत याची खात्री करूनच अर्ज करावा.
पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने विहित मुदतीत सादर केलेलेच अर्ज विचारात घेतले जातील. अन्य पध्दतीने सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही. निवड झालेल्या उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. महापारेषण कंपनीने जाहिरातीत तसेच विविध सुचनांद्वारे प्रसारीत केलेल्या सुचना, अटी, शर्ती मान्य नसलेल्या, कोणत्याही प्रकारे गैरप्रकार करणाऱ्या, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारास ह्या प्रक्रियेतून आणि / अथवा भविष्यातील सर्व भरती प्रक्रियेसाठी प्रातिरोधीत (Debarred) करण्यात येईल. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत PDF जाहिरात वाचा.