अंगणवाडी मुख्यसेविका भरती 2025 | एकूण 0272 पदे | Maharashtra Anganwadi Supervisor Bharti 2025

Maharashtra Anganwadi Supervisor Bharti 2025 : महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) मार्फत गट-क संवर्गातील मुख्यसेविका या पदासाठी भरती प्रक्रियेची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. सदर भरती प्रक्रिया एकूण 0272 रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येत आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी केवळ विभागाच्या icds.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ३० एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता सुरू होईल व २० मे २०२५ रोजी रात्री ११.५५ वाजता समाप्त होईल. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अंगणवाडी मुख्यसेविका भरती 2025 : The Department of Women and Child Development, Maharashtra has officially announced the recruitment process for the post of Chief Servant in Group-C cadre under the Integrated Child Development Service Scheme (ICDS). The recruitment process is being implemented to fill a total of 272 vacant posts. Online applications are being invited from eligible candidates for this.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
(अंगणवाडी मुख्यसेविका भरती 2025)

भरती विभाग : महिला व बालविकास विभाग व्दारे भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळविण्याची संधी.
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासनची (Maharashtra Government) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
पदाचे नाव: मुख्यसेविका (गट-क संवर्ग)
एकूण पदे: 272 जागा. (Maharashtra Anganwadi Supervisor Bharti 2025)
भरती अंतर्गत कार्यालये: 104 नागरी प्रकल्प.
मासिक वेतन : मुख्यसेविका या पदासाठी निश्चित करण्यात आलेली मासिक वेतनश्रेणी रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- इतकी आहे.
शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने कोणत्याही संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असावी. (अंगणवाडी मुख्यसेविका भरती 2025)
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
📑 Pdf
जाहिरात
येथे क्लीक करा
🌐 ऑनलाईन
अर्ज
येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : या भरतीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
वयोमर्यादा :
1) अर्जदाराचे किमान वय २१ वर्षे पूर्ण असावे.
2) अर्जदाराचे कमाल वय ४५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
सेवा अनुभव: उमेदवाराने अंगणवाडी सेविका किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून १ जानेवारी २०२५ पर्यंत १० वर्षे विनाखंड व नियमित सेवा पूर्ण केलेली असावी. सध्या देखील कार्यरत असणे आवश्यक आहे.
भाषा अर्हता: उमेदवार हिंदी व मराठी भाषेत पास किंवा सूटीस पात्र असणे अनिवार्य आहे.
संगणक अर्हता: उमेदवाराकडे एम.एस.सी.आय.टी. प्रमाणपत्र किंवा समकक्ष संगणक अर्हता असणे आवश्यक आहे.
◾सदर भरतीमध्ये 104 नागरी प्रकल्प कार्यालयांत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांना अर्ज करण्याची संधी देण्यात आलेली आहे. (अंगणवाडी मुख्यसेविका भरती 2025)

परीक्षा पद्धत : (Maharashtra Anganwadi Supervisor Bharti 2025)
1) उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षेच्या (Computer Based Test) आधारे केली जाईल.
2) परीक्षा एकाचवेळी महाराष्ट्रभर निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल.
3) परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेचे असेल.
4) प्रत्येक प्रश्नास २ गुण निश्चित करण्यात आलेले आहेत.
5) परीक्षेच्या तारखेबाबत माहिती विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर icds.gov.in प्रसिद्ध केली जाईल.
6) उमेदवारांना परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येईल व त्यावर परीक्षेचे तपशील नमूद असतील.
अर्ज प्रक्रिया : (अंगणवाडी मुख्यसेविका भरती 2025)
1) उमेदवारांनी फक्त आणि फक्त विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (icds.gov.in) ऑनलाईन अर्ज करावा.
2) अर्ज भरण्याची सुरुवात ३० एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता होईल.
3) अर्ज करण्याची अंतिम मुदत २० मे २०२५ रोजी रात्री ११.५५ वाजता आहे.
4) अर्ज करताना उमेदवारांनी स्वतःची पात्रता नीट तपासूनच अर्ज करावा.
5) उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व पात्रता अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात.

आवश्यक प्रमाणपत्र / कागदपत्र :
1)अर्जातील नावाचा पुरावा : आधार कार्ड.
2)वयाचा पुरावा : जन्म नोंदणी दाखला / शाळा सोडल्याचा दाखला.
3)शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र : 10 वी, 12 वी / डिप्लोमा व संविधानिक विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र.
4)मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा : जात प्रमाणपत्र
5)हिंदी व मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा : 10 वी प्रमाणपत्र
6)संगणक ज्ञान पुरावा : एम.एस.सी.आय.टी. अथवा समकक्ष शासन प्रमाणित संगणक प्रमाणपत्र
7)लहान कुटुंबाचे विहित नमूना प्रमाणपत्र.
8)अनुभव प्रमाणपत्र : संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी (ना.प्र.) यांनी निर्गमित केलेले पदोन्न्ती पात्रता विहित नमूना प्रमाणपत्र.
9)नावात बदल झाल्याचा पुरावा : विहित नमून्यातील प्रमाणित गॅझेट प्रत.

अंगणवाडी मुख्यसेविका भरती 2025 : महिला व बाल विकास विभागाच्या मुख्यसेविका गट-क संवर्गातील २७२ पदांची भरती ही एक सुवर्णसंधी आहे. अंगणवाडी सेविका म्हणून नियमित व सातत्यपूर्ण सेवा करणाऱ्या महिलांना त्यांच्या मेहनतीची आणि अनुभवाची दखल घेऊन पुढे जाण्याची ही मोठी संधी आहे. शासकीय सेवा क्षेत्रात पदोन्नतीच्या माध्यमातून पुढील टप्प्यावर काम करण्याची इच्छा असलेल्या अंगणवाडी सेविकांनी ही संधी नक्कीच साधावी. पात्र उमेदवारांनी भरती प्रक्रियेची सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा आणि आपल्या उज्वल भविष्यासाठी योग्य तयारी करून या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा. (Maharashtra Anganwadi Supervisor Bharti 2025)

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!