पुर्ण pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र शासन, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर यांचे कार्यालय यांच्या कार्यालय अंतर्गत शासकीय / निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षित कामासाठी घेणे विधी सल्लागार एक पद भरतीबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर वनवृत्ताअंतर्गत शासकीय/निमशासकीय सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने विवक्षित कामासाठी विधी सल्लागार (Legal Adviser) या पदावर नियुक्तीसाठी आवश्यक पात्रता धारण करीत असलेल्या व वनविभागात करार पध्दतीने विधी सल्लागार (Legal Adviser) या पदावर इच्छूक असलेल्या उमेदवारांकडून महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या शासन निर्णयानुसार अर्ज मागविणेत येत आहे
जे उमेदवार कोल्हापूर (Jobs in Kolhapur) मध्ये काम शोधत असतील त्यांना ही नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही उमेदवारांना विधी विषयक कामकाजाचा अनुभव आहे अशा सेवानिवृत्त अधिकारी / सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधिश / अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश / सेवानिवृत्त प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी असावा. त्यामुळे इच्छुक सेवानिवृत्त अधिकारी / न्यायाधीश यांनीच अर्ज करावेत. या भरतीसाठी फक्त ऑफलाईन (Offline) पद्धतीनेंचं अर्ज करावा. 18 ऑक्टोबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. तर अर्ज पाठवण्याचा पत्ता मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर यांचे कार्यालय, “वनवर्धन” इमारत, तळमजला, मुख्य पोस्ट ऑफिस समोर, ताराबाई पार्क , कोल्हापूर – ४१६००३ हा आहे.