महाराष्ट्र शासन : प्रयोगशाळा परीचर, परिचर, ग्रंथालय परीचर, चौकीदार, माळी व इतर पदांची भरती | पात्रता : 7वी/ 10वी/ 12वी उत्तीर्ण.

🧾 शुध्दीपत्रकयेथे क्लीक करा
📑 Pdf
जाहिरात
येथे क्लीक करा
🌐 ऑनलाईन
अर्ज
येथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे गट-ड संवर्गातील पदांच्या विशेष भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात आली आहे. या भरती अंतर्गत प्रकल्पग्रस्त कुटुंबांमधील पात्र उमेदवारांसाठी एकूण 600+ रिक्त पदांपैकी 50% पदे राखीव ठेवण्यात आली असून, सरळसेवेचा अनुशेष भरून काढण्याकरिता ही भरती होणार आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या विशेष मोहिमेअंतर्गत प्रयोगशाळा परीचर, परिचर, ग्रंथालय परीचर, चौकीदार, माळी, व्हालमन, मत्स्य सहायक व मजूर अशा विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. सदर पदांसाठी फक्त प्रकल्पग्रस्त कुटुंबातील उमेदवारांकडूनच अर्ज मागविण्यात येत आहेत, ज्यांच्या जमिनी कृषी विद्यापीठाकरिता संपादित करण्यात आल्या आहेत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज प्रक्रिया दिनांक 10 मार्च 2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2025 आहे. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करणे आवश्यक असून, अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. ही संधी प्रकल्पग्रस्तांसाठी सरकारी सेवेत प्रवेश मिळवण्याची आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी योग्य ती कागदपत्रे सादर करून निश्चितपणे अर्ज करावा. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!