
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियामक कार्यालयाअंतर्गत शिपाई (गट-ड) पदासाठी एकूण 284 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 22 एप्रिल 2025 पासून सुरु झाली असून, इच्छुक उमेदवारांनी 10 मे 2025 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
◾भरतीचे तपशील पुढीलप्रमाणे:
◾पदाचे नाव: शिपाई (गट-ड)
◾पदसंख्या: 284
◾शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी किमान माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) उत्तीर्ण केलेली असावी.
◾वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे (शासन नियमानुसार मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत लागू)
◾वेतनश्रेणी: ₹15,000 ते ₹47,600
◾परीक्षा शुल्क:
1) खुला प्रवर्ग: ₹1000/-
2) मागासवर्गीय प्रवर्ग: ₹900/-
3) माजी सैनिक: शुल्क माफ
◾आरक्षणाचा लाभ: अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसईबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती, दिव्यांग व अनाथ उमेदवारांसाठी आरक्षित जागा उपलब्ध असून, त्यामध्ये 11 जागा दिव्यांगांसाठी व 2 जागा अनाथ उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
भरतीसंबंधित सर्व अधिकृत माहिती, प्रवेशपत्र, परीक्षा व निवड प्रक्रियेविषयीची माहिती पुढील संकेतस्थळांवर प्रसिद्ध केली जाणार आहे:
https://rfd.maharashtra.gov.in
https://igrmaharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.