
| PDF जाहिरात व अर्ज | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत pdf जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
सरकारी चांगल्या वेतनाची नोकरी शोधताय? वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे गट ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील विविध पदांसाठी ३६९ जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
◾पदांचे तपशील:
1)पदाचे नाव: पहारेकरी, मजूर, गुराखी, परिचर, दोग्धा, पशुधन परिचर, पुस्तक वाहक, फराश, सफाई कामगार आणि तत्सम पदे.
2)एकूण रिक्त पदे: ३६९ पदे.
3)नोकरी ठिकाण: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.
4)शैक्षणिक पात्रता:
▪️पहारेकरी: ०७ वी उत्तीर्ण.
▪️इतर पदे (मजूर, गुराखी, परिचर, दोग्धा, पशुधन परिचर, पुस्तक वाहक, फराश, सफाई कामगार व तत्सम पदे): ०४ थी उत्तीर्ण (अधिक तपशिलांसाठी मूळ जाहिरात वाचावी).
◾वयोमर्यादा (दिनांक ०१ ऑगस्ट २०२५ रोजी):
1)अराखीव (खुला) प्रवर्ग: किमान १८ वर्षे ते कमाल ३८ वर्षे.
2)प्रकल्पग्रस्तांसाठी (इतर प्रवर्गांसाठी): कमाल ४५ वर्षे (प्रकल्पग्रस्तांमुळे).
3)माजी सैनिक (अराखीव): ३८ वर्षे + सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी अधिक ०३ वर्षे.
4)माजी सैनिक (राखीव – मागासवर्गीय/आदुघ/अनाथ): ४३ वर्षे + सशस्त्र दलातील सेवेचा कालावधी अधिक ०३ वर्षे.
5)पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन उमेदवार: ५५ वर्षे.
◾वेतन श्रेणी (दोन्ही पदांसाठी): एस १: १५००० – ४७६०० रुपये.
◾निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड व्यावसायिक चाचणी (६० गुण) आणि शारीरिक क्षमता चाचणी (४० गुण) यांवर आधारित असेल.
◾अर्ज प्रक्रिया: अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
1)अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: ०२ जुलै २०२५
2)अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१ ऑगस्ट २०२५
◾अर्ज शुल्क:
1)अराखीव (खुला) प्रवर्ग: रु. १,०००/-
2)मागास प्रवर्ग/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/अनाथ: रु. ९००/-
◾अर्ज सादर करण्याचा पत्ता: आवक विभाग, कुलसचिव कार्यालय, प्रशासकीय इमारत, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी ४३१ ४०२. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी नमूद केलेल्या अंतिम मुदतीपूर्वी आपले अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या अधिकृत जाहिरातीचा संदर्भ घ्यावा.