
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
सरकारी नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. कुरुंदवाड नगरपरिषद, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर अंतर्गत वर्ग ड प्रवर्गातील फायरमन पदासाठी पात्र उमेदवारांकडून विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण ४ रिक्त पदे भरण्यात येणार असून, या पदासाठी ₹१८,००० ते ₹५६,९०० पर्यंत वेतन देण्यात येईल.
उमेदवाराने किमान एसएससी उत्तीर्ण असावे. तसेच राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई, महाराष्ट्र तांत्रिक शिक्षण मंडळ किंवा अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांचेकडील अग्निशामक कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान (वाचन, लेखन, बोलणे) तसेच MS-CIT किंवा समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. याशिवाय जड वाहन चालविण्याचा परवाना असणेही आवश्यक आहे.
शारीरिक निकषांमध्ये किमान १६५ से.मी. उंची, ८१/८६ से.मी. छाती, ५० किलो वजन आणि चष्म्याशिवाय ५.५ दृष्टी आवश्यक आहे. वयोमर्यादा १८ ते ३३ वर्षे आहे. अर्ज विहीत नमुन्यात A-4 कागदावर भरून, आवश्यक कागदपत्रांसह ०२ मे २०२५ सायं. ६.१५ पर्यंत खालील पत्त्यावर पाठवावा:
मा. मुख्याधिकारी, कुरुंदवाड नगरपरिषद, कुरुंदवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर – ४१६१०६. अपुर्ण, चुकीचे किंवा पात्रता नसलेले अर्ज बाद ठरविण्यात येतील. स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. अधिक अर्ज आल्यास लेखी परीक्षा घेण्यात येईल. दोनपेक्षा जास्त अपत्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.