
pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
सरकारी नोकरी शोधताय? कमी शिक्षण आहे. तुमच्यासाठी चांगली संधी आहे. राज्यातील कृषि विद्यापीठातील गट-क व गट-ड संवर्गातील एकूण रिक्त पदांपैकी ५० टक्के रिक्त पदे त्याच कृषी विद्यापीठाने बाधित प्रकल्पग्रस्तांमधुन भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबविण्यास एक विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली आहे. उपरोक्त शासन निर्णयातील तरतूदीनुसार डॉ. बाळासाहेच सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली करिता ज्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्यक्षात जमिनी संपादित केलेल्या आहेत, अशा प्रकल्पग्रस्तांमधून डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत प्रकल्पग्रस्तांचा सरळसेवेचा अनुशेष भरून काढण्याकरिता विशेष भरती मोहिमे अंतर्गत सोबतच्या विहित नमुन्यामध्ये पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने दिनांक 28 फेब्रुवारी 2025 पर्यन्त अर्ज मागविण्यात येत आहेत.
वेळापत्रकामध्ये काही बदल झाल्यास, सुधारित वेळापत्रक केवळ या विद्यापीठाच्या http://www.dbskkv.org या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल. परीक्षा व त्यापुढील निवड प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या http://www.dbskkv.org या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचून घ्या.