महाराष्ट्र शासन : लेखा व कोषागारे विभागांत भरती सुरू! | मासिक वेतन – 29,200 ते 92,300 रूपये | ऑनलाईन अर्ज करा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

महाराष्ट्र शासन, वित्त विभाग नुसार संचालनालय, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील कनिष्ठ लेखापाल संवर्गाचे सेवाप्रवेश नियम विहित करण्यात आलेले आहेत. सदर सेवाप्रवेश नियमानुसार कनिष्ठ लेखापाल या प्रादेशिक संवर्गाचे नियुक्ती प्राधिकारी विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे आहेत. त्यानुषंगाने अध्यक्ष, प्रादेशिक निवड समिती, कोकण विभाग तथा सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोकण विभाग यांचेकडून आवश्यक पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोकण विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय, कोकण, संचालनालय, लेखा व कोषागारे, मुंबई, अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई, आभासी कोषागार कार्यालय, मुंबई, राज्य अभिलेख देखभाल अभिकरण, मुंबई व अधिनस्त जिल्हा कोषागार कार्यालय, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील कनिष्ठ लेखापाल गट-क संवर्गातील सरळसेवेने भरतीसाठी ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज https://mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मागविण्यात येत आहेत. टपालाद्वारे / हस्तबटवडयाद्वारे अथवा कुरिअरने पाठविलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

सरळसेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात https://mahakosh.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी जाहिरातीत नमूद संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत. सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रिये संबंधित आवश्यक अद्यावत माहिती प्राप्त करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

error: Content is protected !!