
अधिकृत जाहिरात व अर्ज | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
सरकारी नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. बॉम्बे उच्च न्यायालय मध्ये माळी / मदतनीस ही एकूण 01 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही किमान चौथी उत्तीर्ण + मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन / मानधन श्रेणी: ९-३ : (रुपये १६६००-५२४००/-) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते असेल. या भरतीसाठी वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गासाठी: १८ ते ३८ वर्षे, मागासवर्गीय प्रवर्गासाठी: १८ ते ४३ वर्षे असणे आवश्यक आहे.
स्पीड पोस्टाव्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातुन किंवा वरील नमूद केलेल्या तारखेनंतर मिळालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. उपरोक्त अर्ज/कागदपत्रे इत्यादी समाविष्ट असलेल्या लिफाफ्यावर “माळी/मदतनीस पदासाठी अर्ज” असे लिहावे. सदर प्रक्रिये दरम्यान घेतल्या जाणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखतीसाठी उमेदवारास स्वखर्चाने हजर रहावे लागेल. नियुक्ती व अल्पसुचीचे (shortlisting) सर्व अधिकार प्रशासन, उच्च न्यायालय, मूळ शाखा, मुंबई यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत. माळी/मदतनीस हे एकाकी पद (Isolated Post) असून, सदर पदास भविष्यात पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत यांची उमेदवाराने नोंद घ्यावी.
भरती प्रकिया कोणत्याही वैध कारणामुळे रद्द झाल्यास त्याबाबत अर्जदाराला कोणताही दावा करता येणार नाही. परीक्षेचा प्रकार, परीक्षा स्थगित करणे व रद्द करणे, अंशतः बदल करणे, याबाबत सर्व अधिकार प्रशासन, उच्च न्यायालय, मुंबई, यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत. याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही. निवड प्रक्रिया सुरु झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी जर अर्जदाराने अर्जात दिलेली माहिती खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्याची उमेदवारी नियुक्ती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल अथवा नियुक्त झाल्यास त्याला / तिला पदावरून काढून टाकण्यात येईल. उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाबाहेरील कोणत्याही अनपेक्षित घटनेमुळे भरती प्रक्रियेचे वेळापत्रक बदलू शकते असा बदल वेळोवेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. त्याकरिता उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळास वेळोवेळी भेट द्यावी.
उमेदवाराला कोणत्याही बदलाबाबतची सूचना उशीरा मिळाल्यामुळे नियोजित तारखेस व वेळेस प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक चाचणी व मुलाखतीस उमेदवार अनुपस्थित राहिल्यास, उच्च न्यायालय प्रशासनाकडून या बाबत कोणतीही तक्रार / दावा विचारात घेतला जाणार नाही किंवा ऐकला जाणार नाही. उमेदवाराने माळी कामाची प्रात्यक्षिक परीक्षा तसेच शारीरिक क्षमता चाचणी मध्ये मिळविलेल्या गुणांच्या आधारे तसेच त्याच्या अर्जाची छाननी व त्याने मुलाखतीच्या वेळेस सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर उमेदवाराची मुलाखतीची पात्रता अंतिमरित्या गुणवत्तेच्या आधारवर ठरविण्यात येईल. पात्र उमेदवारांना प्रात्यक्षिक परीक्षा, शारिरीक क्षमता चाचणी, तसेच मुलाखतीसाठी नियोजित तारखांना स्वः खर्चाने हजर रहावे लागेल. निवड यादीतील उमेदवारांची नियुक्ती सुरुवातीला दोन वर्षांच्या परिविक्षाधीन कालावधीसाठी असेल. परिविक्षाधीन कालावधी समाधानकारक पूर्ण झाल्याबद्दल आदेश जारी होईपर्यंत नियुक्तीच्या सेवा कोणत्याही वेळी, कोणतीही नोटीस न देता किंवा कोणतेही कारण न देता समाप्त केल्या जातील. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धती ही ऑफलाईन आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 एप्रिल 2025 आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता: मा. प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, P.W.D. इमारत, फोर्ट, मुंबई- ४०००३२. अधिक माहितीसाठी वरती दिलेली pdf जाहिरात पहा.