पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
चांगल्या वेतनाची नोकरी शोधत असाल तर ही मोठी संधी आहे. धर्मदायी आयुक्त महाराष्ट्र यांच्या व्दारे लघुलेखक ही एकूण 04 पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. नियम व अटी : अर्ज करणाऱ्या सेवानिवृत्त व्यक्ती यांनी त्यांची शारीरीक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असल्याबाबतचे, स्वयंघोषणापत्र सादर करणे बंधनकारक राहील. करार पधदतीने नियुक्त झालेल्या अर्जदारास नेमूणक दिलेली कामे पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधीत व्यक्तीची राहील व तसे बंधपत्र / हमीपत्र अटी व शर्ती संबंधीत उमेदवाराला मान्य आहेत ह्याबाबतचे उमेदवाराने रु.१००/- च्या स्टॅम्पपेपरवर बंधपत्र देणे बंधनकारक राहील.
अर्ज करणाऱ्या सेवानिवृत्त व्यक्ती विरुध्द कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशी व न्यायालयीन प्रकरण चालु अथवा प्रलंबीत नसावे. याबाबत अर्जदारांनी ज्या कार्यालयातुन सेवानिवृत्त झाले आहे, त्या संबंधीत कार्यालयाकडून तसे प्रमाणपत्र देणे बंधणकारक राहील. करार पध्दतीने नियुक्ती करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध (Conflict of interest) जाहीर करणे आवश्यक राहील. करार पध्दतीने नियुक्त झालेल्या व्यक्ती यांना आवश्यक प्रसंगी दौरा करावा लागल्यास त्यांना त्यांच्या निवृत्तीच्या वेळच्या वेतमानास अनुसरुन प्रवास भत्ता व दैनिक भत्ता अनुज्ञेय राहील.
करार पध्दतीवरील व्यक्ती यांनी त्याना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे / माहिती, कामाबाबत व आधारसामुग्री बाबत गोपनीयता पाळणे बंधणकारक राहील. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2024 आहे.