Maharashtra Government Jobs 2025 : महानगरपालिका आस्थापनेवरील खाली नमूद केलेल्या गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने (नामनिर्देशनाने) भरण्याकरीता पदाची शैक्षणिक अर्हता व इतर अटींची पूर्तता करण्या-या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज मागवित आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. एकूण रिक्त पदे, भरती बद्दल आवश्यक माहिती, pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Maharashtra Government Jobs 2025 : The Municipal Corporation is inviting applications online from eligible candidates who fulfill the educational qualification and other conditions of the post to fill the vacant posts in Group-C cadre mentioned below in the establishment through direct service (nomination).
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : विविध पदे. (अधिकृत जाहिरात पहा.)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 25,500 ते 81,100 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾अधिकृत जाहिरात, अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 43 वर्ष.
◾भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव व इतर आवश्यक पात्रता :
▪️कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : मान्यताप्राप्त विद्यापिठातील AICTE द्वारा मान्यताप्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील किमान पदवी परिक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हताधारक (A.M.L.E)
▪️कनिष्ठ अभियंता (विद्युत) : मान्यताप्राप्त विद्यापिठाची AICTE द्वारा मान्यताप्राप्त किमान विद्युत अभियांत्रिकी / इलेक्ट्रॉनीक्स शाखेची पदवी किंवा समकक्ष अर्हताधारक (A.M.L.E)
▪️स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक : मान्यताप्राप्त विद्यापिठातील AICTE द्वारा मान्यताप्राप्त किमान स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदविका धारण केलेली असावी.
▪️नर्स परिचारीका (जी.एन.एम) : एचएसएससी नंतर जी.एन. एम अभ्यासक्रम पूर्ण (ट्रेड नर्स) व नर्सिंग कॉन्सील ऑफ महाराष्ट्राचे रजिस्ट्रेशन.
▪️वृक्ष अधिकारी : अ) मान्यताप्राप्त कृषी विद्यापिठाची बी.एस.सी (हॉर्टिकल्चर्स) अॅग्रीकल्चर/ बॉटनी/फरिस्ट्री पदवी/ मान्यताप्राप्त विद्यापिठाची वनस्पती शास्त्रातील पदवी परिक्षा उत्तीर्ण.
ब) अनुभव: उद्यान विकास देखभाल वृक्ष संरक्षण व संवर्धन रोप वाटीका व्यवस्थापन क्षेत्रातील कामाचा ५ वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
◾एकूण पदे : 0245 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾परीक्षा शुल्क :▪️अराखीव – १०००/- रू.
▪️मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक / अनाथ – ९००/- रू.
◾नोकरी ठिकाण : नागपूर महानगरपालिका. (Nagpur Mahanagarpalika Bharti 2025)
◾उक्त सर्व पदांसाठी अर्ज फक्त नागपूर महानगरपालिकेचे ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
◾महापालिकेने निश्चित केलेल्या दिनांकास व ठिकाणी पात्र उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
◾जाहीरातीत नमूद केलेल्या पद संख्येत व प्रवर्गनिहाय आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
◾पदसंख्या व आरक्षणात बदल झाल्यास त्याबाबतची सूचना वेळोवेळी नागपूर महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 15 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.