
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यातील पशुसंवर्धन क्षेत्रातील “पशुधन विकास अधिकारी (गट-अ)” या पदासाठी भव्य भरती जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिपत्याखाली ही भरती होत आहे. या भरतीअंतर्गत एकूण २,७९५ पदांवर उमेदवारांची निवड केली जाणार असून ही कायमस्वरूपी नोकरीची संधी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा रु. ५६,१००/- इतके प्रारंभिक वेतन दिले जाईल.
◾शैक्षणिक अर्हता:
उमेदवारांनी पशुवैद्यक शास्त्र किंवा पशुवैद्यक शास्त्र व पशुधन व्यवस्थापन विषयातील पदवी प्राप्त केलेली असावी. ही पदवी भारतीय पशुवैद्यक परिषद अधिनियम, 1984 अन्वये मान्यता प्राप्त विद्यापीठातून घेतलेली असावी.
वयोमर्यादा:
सामान्य प्रवर्गासाठी वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे, तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी शासन निर्णयानुसार सूट दिली जाईल.
◾अर्ज प्रक्रिया:
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २९ एप्रिल २०२५ पासून सुरू होणार असून अंतिम दिनांक १९ मे २०२५ आहे.
◾अर्जासाठी शुल्क:
▪️खुला प्रवर्ग: ₹३९४/-
▪️मागास प्रवर्ग: ₹२९४/-
अधिक माहिती व अर्ज लिंक:
उमेदवारांनी https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन सविस्तर जाहिरात व अर्जाची प्रक्रिया पाहावी.