
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी १११७ जागांची मेगाभरती जाहीर झाली आहे. करिअर घडवण्याची ही सुवर्णसंधी असून, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये एकूण १११७ पदे भरली जात आहेत. ग्रंथपाल, आहारतज्ञ, समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय), भौतिकोपचार तज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ई.सी.जी. तंत्रज्ञ, क्ष किरण तंत्रज्ञ, सहायक ग्रंथपाल, औषधनिर्माता, दंत तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहायक, क्ष किरण सहायक, ग्रंथालय सहायक, प्रलेखाकार/ग्रंथसूचीकार (डॉक्युमेंटालिस्ट/कॅटलॉगर), वाहन चालक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक ही पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान दहावी उत्तीर्ण ते पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.
◾वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १८ ते ३८ वर्षे, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी १८ ते ४३ वर्षे.
◾वेतनश्रेणी: निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहिना १९,९००/- रुपये ते १,४२,४००/- रुपयांपर्यंत आकर्षक वेतन मिळेल.
◾अर्ज शुल्क:
1) अराखीव प्रवर्ग: १०००/- रुपये + बँक चार्जेस
2) मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ: ९००/- रुपये + बँक चार्जेस.
◾निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड संगणक आधारित ऑनलाईन परीक्षेद्वारे केली जाईल. वाहनचालक, उच्च श्रेणी लघुलेखक आणि निम्नश्रेणी लघुलेखक या पदांसाठी व्यावसायिक चाचणी देखील घेतली जाईल.
◾नोकरीचे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
◾अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
◾ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ०९ जुलै, २०२५. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.