‘महाराष्ट्र होमगार्ड’ मध्ये एकूण 2,771 जागांसाठी भरती सुरू! | शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण | आजचं ऑनलाईन अर्ज करा.

Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

महाराष्ट्र होमगार्ड भरती 2025 : होमगार्ड विभाग, मुंबई मध्ये मोठ्ठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 2,771 जागा भरल्या जात आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी फक्त मुंबई, उपनगर रेल्वे येथील उमेदवार पात्र ठरतील. महाराष्ट्रातील होमगार्ड संघटना ही पगारी संघटना नसून शासन संचलित पुर्णतः मानसेवी तत्वावर आधारीत आहे. या संघटनेचे सदस्य होणे म्हणजे कोणत्याही प्रकारची नोकरी अथवा रोजगार नाही. हे सदस्यत्व तीन वर्षाकरीता दिले जात असून आपण संघटनेसाठी दिलेल्या सेवेच्या गुणवत्तेवर पुढे ३-३ वर्षांच्या टप्प्याने वयाच्या ५८ वर्षांपर्यंत पुर्णनोंदणी कृत करता येते. होमगार्डसदस्यांचे कर्तव्य होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही पोलीस दलाच्या मागणी प्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखणे कामी पोलीस दलासोबत बंदोबस्त कर्तव्य, आपतकालीन परिस्थिती मध्ये अग्निशमन, विमोचन, पूरविमोचन तसेच रोगराई / महामारीकाळात, संपकाळात प्रशासनांस मदत कार्य अशी कर्तव्ये दिली जातात.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

महाराष्ट्र होमगार्ड भरती 2025 : होमगार्ड ना देय भत्ते होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रु. १०८३/- कर्तव्य भत्ता व रु. २००/- उपहार भत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात रु. २५०/- भोजनभत्ता व खिसा भत्ता म्हणून रु.१००/- तसेच साप्ताहिक कवायतीसाठी रु. १८०/-कवायत भत्ता दिला जातो. होमगार्ड सदस्यांना दररोज कर्तव्य दिले जात नाही परंतु अत्यावश्यक प्रसंगी बंदोबस्त कर्तव्याकरीता विनाकारण अनुपस्थित राहणाऱ्या कर्तव्यामध्ये कसूर करणाऱ्या / आदेशांचे पालन न करणाऱ्या होमगार्ड सदस्यांवर मुंबई होमगार्ड अधिनियम १९४७ कलम ७ (१) अन्वये बडतर्फ किंवा रु. २५०/- इतका दंड/तीन महीन्याची साधी कैद अशी शिक्षा करण्याची तरतूद आहे. (Maharashtra Homeguard Bharti 2025)

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

होमगार्ड नोंदणी करीता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही सदस्यत्व मिळणे करीता काणत्याही इतर मार्गाचा (वशिला किंवा लाच) अवलंब करु नये. या करीता कोणीही लाच पैशाची मागणी केल्यास अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, बृहन्मुंबई किंवा मा. समादेशक होमगार्ड बृहन्मुंबई तथा पोलीस उपआयुक्त, सशस्त्र पोलीस ताडदेव, मुंबई यांचेशी संपर्क साधावा.

महाराष्ट्र होमगार्ड भरती 2025 : होमगार्ड सदस्यत्वाचे फायदे :
१. सैनिकी गणवेश परीधान करणेचा मान व विनाशुल्क सैनिकी प्रशिक्षण
२. ३ वर्षे सेवापुर्ण होमगार्डना राज्य पोलीसदल, वनविभाग, अग्निशमन दलामध्ये ५% आरक्षण,
३. प्रथमोपचार, अग्निशमन, विमोचन या सारख्या विषयांचे प्रशिक्षण घेण्याची संधी.
४. गौरवास्पद कामगिरी केल्यास विवीध पुरस्कार/पदके मिळविण्याची संधी.
५. स्वतःचा व्यवसाय/शेती इ. सांभाळत देशसेवा करण्याची संधी. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.


error: Content is protected !!