होमगार्ड भरती 2024 चे भरती पत्रक | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
10वी पास असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. महाराष्ट्र होमगार्ड अंतर्गत 9,700 पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. राज्यात शांतता व सुव्यवस्था धित ठेवण्यासाठी किंबहुना खांद्याला खांदा लावून होमगार्ड दलाचे कार्यरत असतात. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा होमगार्ड विभाग अधिकाधिक सक्षम करण्यासाठी ही 9000+ पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या 9,700 रिक्त जागा भरल्यावर राज्यातील पोलिसांना बंदोबस्तात मदत होणार आहे. यासाठी रिक्त जागांची भरतीप्रक्रिया राबवली जात आहे.
जाहिरात केलेल्या पत्रक मध्ये म्हटले आहे की होमगार्ड विभागाचे परिपत्रक नुसार होमगार्ड निवड समितीसाठी पोलीस निरिक्षक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्याबाबतच्या सुचना सर्व पोलीस घटक कार्यालयांना कृपया देण्यात याव्यात. तसेच दि. 16.8.2024 पासून भरती प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण झाल्यावर आपल्या अधिनस्त राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात माहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवडयापासून होमगार्डना 35 दिवसांचे प्राथमिक प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यात यावे अशी विनंती आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेले पत्रक वाचा.