पोलीस विभागांत कामाची संधी! | आजचं ऑनलाईन अर्ज करा | Maharashtra Police Bharti 2025

Maharashtra Police Bharti 2025 : पोलीस आयुक्त कार्यालय यांचे आस्थापनेवर रिक्त पदे भरण्यासाठी खालील अटी व पात्रता पुर्ण असलेल्या उमेदवाराकडुन नियुक्तीसाठी ऑनलाईन (Online) अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. पोलीस विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Maharashtra Police Bharti 2025 : Online applications are invited from candidates who fulfill the following conditions and qualifications to fill the vacant posts in the Police Commissioner's Office. Eligible and interested candidates should submit their applications as soon as possible.
⚠️ महत्वाचे : या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : पोलीस आयुक्तालय द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : पोलीस विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : खाली देण्यात आलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : 25,000 ते 35,000 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मानधन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 60 वर्षा पर्यंत.
भरती कालावधी : 11 महिन्यासाठी पुर्णतः कंत्राटी पध्दतीने रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव : गट-अ (०१) पद व विधी अधिकारी गट-ब (०१) पद व विधी अधिकारी यांचे ०२ पदे.
इतर आवश्यक पात्रता :
▪️विधी अधिकारी गट-अ :
१) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा तसेच तो सनद धारक असावा.
२) विधी अधिकारी गट- अ या पदासाठी वकीली व्यवसायाचा किमान ०७ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
३) उमेदवारास गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत ज्ञान संपन्न असावा ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल.
४) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असावे.
▪️विधी अधिकारी गट-ब :
१) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा. तो सनद धारक असावा.
२) विधी अधिकारी गट-ब या पदासाठी वकीली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
३) उमेदवारास गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत ज्ञान संपन्न असावा ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल.
४) उमेदवारास मराठी, हिंदी, व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान आवश्यक असेल.
▪️विधी अधिकारी :
१) उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा तो सनद धारक असावा.
२) विधी अधिकारी या पदासाठी वकीली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
३) उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ. बाबतीत ज्ञान संपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल.
४) उमेदवारास मराठी, हिंदी, व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.
एकूण पदे : 04 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर. (Maharashtra Police Bharti 2025)
◾उमेदवारानी ऑनलाईन भरण्यात आलेल्या अर्जाची प्रिंट काढुन प्रत्यक्ष मुलाखतीच्या वेळेस मुळ कागदपत्रासह हजर रहावे.
◾सदर पदाची नेमणूक ही पूर्णतः कंत्राटी पध्दतीने असेल. उमेदवाराला शासकीय अधिकारी/कर्मचारी/म्हणून गणले जाणार नाही.
◾सदर नेमणुका या करार नियुक्ती पध्दतीने प्रथमतः ११ महिन्यासाठी करण्यात येतील, ११ महिन्यानंतर आवश्यक असल्यास करारनाम्याची मुदत वेळोवेळी (जास्तीत जास्त ३ वेळा, ११ महिन्याकरिता) वाढविता येईल. ३ वेळा मुदतवाढ दिल्यानंतरही अशा उमेदवारांना पुनःश्च नियुक्ती करणे आवश्यक आहे. असे सक्षम प्राधिका-यांचे मत झाल्यास त्या उमेदवारास पुनःश्च निवड प्रक्रियेला सामोरे जावे लागेल.
◾उमेदवाराची निवड लेखी परीक्षेनंतर मुलाखतीद्वारे करण्यात येईल. मुलाखत पोलीस आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात येईल. (Maharashtra Police Bharti 2025)
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 15 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
E-mail पत्ता : cp.aurangabad@mahapolice.gov.in
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!