Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता सदर पदासाठी आवश्यक असलेली अर्हता / पात्रता धारण करीत असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
Maharashtra Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : Applications are invited online from the eligible and interested candidates possessing the qualification/eligibility required for the said post to fill various vacant posts in Class-3 cadre under the establishment of Social Welfare Commissionerate, Maharashtra State Pune.
◾भरती विभाग : समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : खाली देण्यात आलेली PDF जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी ते पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 25,500 ते 81,100 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾पूर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण) / गृहपाल / अधिक्षक (महिला) :
1] शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य).
2] महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक :
1] शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता (शारीरिक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असलयास प्राधान्य.)
2] महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️समाज कल्याण निरीक्षक :
1] शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणुन मान्य केलेली अर्हता.
2] महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️उच्चश्रेणी लघुलेखक :
1] शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण.
2] उच्चश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण, किंवा २. उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण.
3] वरील ब) मधील १ व २ करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन १२० शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य)
क) टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनिट किंवा
ड) टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनिट.
4] महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️निम्नश्रेणी लघुलेखक :
1] शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण.
2] निम्नश्रेणी लघुलेखक (इंग्रजी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण, किंवा उच्चश्रेणी लघुलेखक (मराठी) शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रति मिनिट इंग्रजी लघुलेखन परिक्षा उत्तीर्ण.
3] वरील “ब” मधील १ व २ करीता (इंग्रजी व मराठी दोन्ही लघुलेखन १०० शब्द प्रति मिनिट असल्यास प्राधान्य).
क) टंकलेखन (इंग्रजी) ४० शब्द प्रतिमिनिट किंवा
ड) टंकलेखन (मराठी) ३० शब्द प्रतिमिनिट
4] महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची एम.एस.सी.आय.टी संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️लघुटंकलेखक :
1] शासनमान्य माध्यामिक शालांत परीक्षा बोर्डाची (S.S.C) परीक्षा उत्तीर्ण.
2] लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असले पाहीजे. (महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद किंवा औदयोगिक प्रशिक्षण संस्था यांचेकडील प्रमाणपत्र).
◾एकूण पदे : 0219 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Maharashtra)
◾परीक्षा शुल्क :▪️खुला प्रवर्ग -1000/- रुपये.
▪️मागास प्रवर्ग – 900/- रुपये.
◾अर्ज फक्त ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.