
📑 Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महाराष्ट्र शासनची नोकरी शोधताय? डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड येथे विविध गट-ड संवर्गातील पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीत एकूण ८६ रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीमध्ये शिंपी, धोबी, स्ट्रेचर बेअरर, प्रयोगशाळा सेवक, स्वयंपाकी, स्वयंपाकी सहाय्यक, एक्स-रे सर्व्हंट, कॅस्युलाटी सर्व्हंट, डिस्पेंसरी सर्व्हंट, शिपाई, टेबल बॉय, पुरुष सेवक, मेस सर्व्हंट, आया, वॉचमन, नर्सिंग असिस्टंट, क्लिनर, माळी व प्रयोगशाळा परिचर या गट-ड संवर्गातील पदांचा समावेश आहे.
◾शैक्षणिक पात्रता:
सर्वसाधारण पदांसाठी उमेदवाराने किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून स्वच्छक पदासाठी ७ वी उत्तीर्ण आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
◾वयोमर्यादा:
खुल्या प्रवर्गासाठी कमाल वय ३८ वर्षे आणि राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे निश्चित करण्यात आले आहे.
◾वेतनश्रेणी:
गट-ड सर्व संवर्गासाठी वेतन श्रेणी एस-१: ₹१५,००० – ₹४७,६०० आहे, तर प्रयोगशाळा परिचर पदासाठी एस-६: ₹१९,९०० – ₹६३,२०० इतके वेतन देण्यात येणार आहे.
◾अर्ज प्रक्रिया:
अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ मे २०२५ आहे.
◾नोकरी ठिकाण:
सर्व पदांसाठी नियुक्ती ठिकाण नांदेड येथे असणार आहे.
◾पात्र उमेदवारांनी अंतिम दिनांपूर्वी आपले अर्ज सादर करावेत.