
महाराष्ट्र वनविभागात नवीन पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती प्रादेशिक वनवृत्त, नागपूर तसेच सामाजिक वनीकरण विभाग आणि वन्यजीव विभागांतर्गत केली जाणार आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या वनसंरक्षक (प्रादेशिक कार्यालय) नागपूर यांनी प्रसिद्ध केली आहे. ही संधी वनविभागात नोकरी मिळविण्याची संधी आहे. PDF जाहिरात व अधिकृत वेबसाइट लिंक खाली पहा.
अर्जदाराने आपला स्वहस्ताक्षरित किंवा टंकलिखीत अर्ज सर्व आवश्यक माहितींसह 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत वनसंरक्षक (प्रादेशिक), नागपूर वनवृत्त, नवीन प्रशासकीय इमारत, झिरो माईल, नागपूर – 440001 या पत्त्यावर पाठवावा. अर्ज वेळेत व आवश्यक कागदपत्रांसह सादर करणे अनिवार्य आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.