महसूल व वनविभाग अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध! | अधिकृत जाहिरात येथे पहा.

जाहिरात व अर्जयेथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ अंतर्गत महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरणाची स्थापना केली आहे. न्यायाधिकरणाचे कामकाज हे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ व त्या अंतर्गत कलम ३१९ नुसार तयार करण्यात आलेल्या २०१३ च्या नियमनानुसार केले जाते. महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरण नियम, २०२५ नुसार सदर न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष, सदस्य (न्यायिक व प्रशासकीय) या पदांकरिताच्या अर्हता, पदाची मुदत व त्यांच्या सेवेच्या अटी व शर्ती तसेच त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया निश्चित केलेली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

न्यायायाधिकरणाचे मुख्य खंडपीठ बृहन्मुंबई येथे असुन पुणे, छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथे इतर खंडपीठे आहेत. मुख्य खंडपीठ बृहन्मुंबई येथे अध्यक्ष, एक सदस्य न्यायिक व एक सदस्य प्रशासकीय तर इतर प्रत्येक खंडपीठांकरिता एक सदस्य न्यायिक व एक सदस्य प्रशासकीय याप्रमाणे पदसंख्या आहे. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ही शुक्रवार, दिनांक ०७-०३-२०२५ रोजी दु. ०२.०० वाजेपर्यंत आहे. अर्ज पाठवण्याचा ई-मेल पत्ता: jla.revenue@maharashtra.gov.in अर्ज सादर करण्याचा पत्ता: उप सचिव, कार्यासन ज-१अ, महसूल व वन विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!