महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये नवीन रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू | शैक्षणिक पात्रता : 10वी व इतर | Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत सन 2024 – 2025 करिता रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. 10वी व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.क. मर्या. संवसु विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahavitaran Bharti 2024 : Maharashtra State Electricity Distribution Company is inviting online applications from eligible candidates to fill up the vacancies for the year 2024-2025.

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : महावितरण मध्ये काम करण्याची चांगली संधी आहे.
पदाचे नाव : वायरमन, इलेक्ट्रीशियन व कोपा.
शैक्षणिक पात्रता : 10वी व इतर आवश्यक पात्रता. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾पूर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे.
भरती कालावधी : 1 वर्षाच्या कालावधी साठी ही रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾ही कोणतीही नोकरी नसून अप्रेंटीशिप आहे.
पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रीशियन/ वायरमन/ कोपा)
व्यावसायिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) उतीर्ण प्रमाणपत्र किवा तत्सम परीक्षा उतीर्ण आवश्यक व NCVT नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
एकूण पदे : 056 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : वर्धा. (Jobs in Wardha)
◾प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा राहील व विद्यावेतन नियमाप्रमाणे राहील.
◾भरती प्रक्रिया निगडीत सर्व अधिकार व्यवस्थापनाने राखून ठेवलेले आहे व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविल्या जाणार नाही.
◾भरती प्रक्रीये दरम्यान उमेदवाराने राजकीय किवा इतर अधिकाऱ्यांकडून दबाव आणल्यास आपली उमेदवारी रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
◾उमेदवार हे फक्त महावितरण वर्धा विभाग यांच्या कार्य क्षेत्रानांतर्गत रहिवाशी असल्यास उमेदवारी अर्ज ग्राह्य धरण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच वर्धा जिल्ह्यातील अधिवास (Domicle) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
◾या जाहिरातीच्या पूर्वीचे अर्ज व दि. 31.10.2024 नंतरचे कोणतेही अर्ज ग्राह्य धरल्या जाणार नाही. उमेदवाराने online अर्ज करतांना पोर्टलवर मूळप्रमाणपत्रे योग्यरीत्या अपलोड करणे बंधनकारक आहे. तसेच के. वाय सी करणे आवश्यक आहे.
◾शिकाऊ उमेदवाराची निवड हि दहावी व आय.टी.आय यांच्या सरासरी गुणांच्या टक्केवारी प्रमाणे व वरील अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रवर्ग निहाय निवड केली जाणार आहे.
अर्ज करतांना खालील कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे :
1] एस.एस.सी. गुणपत्रिका व सनद प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडावी.
2] आय.टी.आय उत्तीर्ण गुणपत्रिका (चार सेमिस्टर) व सर्व प्रमांणपत्राची साक्षांकित प्रत जोडावी.
3] उमेदवाराने मागास प्रवर्गातून अर्ज केला असल्यास जात प्रमाण पत्राची प्रत जोडावी.
4] वर्धा जिल्ह्यातील अधिवास (Domicle) प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत जोडावी.
◾गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची यादी दि. 11.11.2024 रोजी कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कं. मर्या. संवसु विभाग प्रशासकीय इमारत बोरगाव नाका वर्धा ता. वर्धा जिल्हा. वर्धा कार्यालयात लावण्यात येईल तसेच निवड झालेले प्रशिक्षणार्थी यांच्या Mail ID वर पाठविण्यात येईल.
◾निवड झालेले प्रशिक्षणार्थी यांनी वर्धा विभागीय कार्यालयामध्ये संपूर्ण मूळ शैक्षणिक प्रमाणपत्र सह तपासणी करिता व त्यासोबत छायांकित प्रतीचा एक संच घेऊन दिनांक 18.11.2024 रोजी सकाळी 11.00 वाजता उपस्थित राहावे. वेळेवर सदर प्रकीयेत बदल करण्याचा अधिकार संबंधीत कार्यालयाचे सक्षम अधिकाऱ्यास राहतील.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा. पुर्ण माहितीसाठी वरती दिलेली pdf जाहिरात पहा.


error: Content is protected !!