महाराष्ट्र राज्य वीज वितरण मध्ये 0203 रिक्त पदासाठी भरती जाहिर! Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मध्ये वायरमन, लाईटमन व इतर 0203 पदांसाठी जागा भरण्यात येणार आहेत. त्या साठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 10वी व ITI उत्तीर्ण उमेदवारांना महावितरण मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड आणि अधीक्षक, अभियंता, ग्रामीण मंडल, महावितरण द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahavitaran Bharti 2024 : Maharashtra Rajya Vidyut Vitratan Co. Ltd. is going to fill the vacancies for Wireman, Lightman and other 0203 posts. For that, applications are invited online from interested and eligible candidates who meet the following eligibility criteria.

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : महावितरण सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
एकूण पदे : 0203 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव : वायरमन, लाईटमन व इतर पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
शैक्षणिक पात्रता : 10वी व ITI उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 32 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री / तारतंत्री/ COPA).
व्यावसायिक पात्रता : (1) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे.
(2) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री/ तारतंत्री/ कोपा या व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण असावा.
नोकरी ठिकाण : नागपूर (Jobs in Nagpur)
◾शैक्षणिक दस्ताऐवज (1) एस.एस.सी. व आय.टी.आय. वीजतंत्री / तारतंत्री चार सेमिस्टर व कोपा या व्यवसायातील दोन सेमिस्टरची उत्तीर्ण गुणपत्रिकेची मूळप्रत. (2) आधारकार्ड व मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र व रहिवासी प्रमाणपत्र व इतर सर्व अनुषंगीक आवश्यक कागदपत्रांची मूळप्रत उमेदवारांने स्वतः च्या प्रोफाईलवर स्कॅन करून अपलोड करावे.
◾वरील शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवाराची नोंदणी ग्राह्य धरली जाईल.
◾वरील कालावधीत ऑनलाईन (Online) अर्ज सादर न केल्यास अशा अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾शिकाऊ उमेदवारांची निवड ही एस.एस.सी. व आ.टी.आय. गुणांच्या टक्केवारीनुसार (अनुक्रमे 40 व 60 टक्के) अटी व शर्तीच्या अधिन राहून प्रवर्गनिहाय निवड केली जाईल.
हार्ड कॉपी पाठवण्याची सुरुवातीची तारीख : 24 जून 2024.
हार्ड कॉपी पाठवण्याची शेवटची तारीख : 02 जुलै 2024
हार्ड कॉपी पाठवण्याचा पत्ता : संबंधित कार्यालय.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!