Mahavitaran Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील “विद्युत सहाय्यक” पदाची वेतनगट -४ मधील विभागस्तरीय सेवाज्येष्ठतेतील 05347 रिक्त पदे सरळसेवा भरतीद्वारे मानधन तत्ववार भरण्याकरीता अर्हताप्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी 10वी, 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेले जाहिरात वाचून अर्ज करा.
Mahavitaran Bharti 2024 : 05347 vacancies in department level seniority in pay group-4 for the post of "Electrical Assistant" in the office under the jurisdiction of Maharashtra State Vidyut Vidyut Vitratan Co.Limited are inviting applications in the prescribed format from the qualified candidates through direct recruitment.
◾भरती विभाग : महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾एकूण पदे : तब्बल 05347 पदे भरली जात आहेत.
◾पदाचे नाव : विद्युत सहाय्यक.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾या भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वेतन/ मानधन :▪️प्रथम वर्ष- एकूण मानधन रुपये १५,०००/-
▪️द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये १६,०००/-
▪️तृतीय वर्ष- एकूण मानधन रुपये १७,०००/-
◾वयोमर्यादा :१८ ते २७ वर्षे.
◾भरती कालावधी : पदाचा ०३ वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना “तंत्रज्ञ” या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल.
◾अर्ज शुल्क :▪️खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST
▪️मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾व्यावसायिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण + ITI उत्तीर्ण.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
◾इतर अटी :▪️उमेदवार हा महाराष्ट्रातील अधिवासी (Domicile) असणे आवश्यक आहे.
◾निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीच्या सेवेत ३ वर्षाचा कालावधी समाधानकारकपणे पूर्ण केल्यानंतर “तंत्रज्ञ” या पदावर अनुशेष आणि रिक्त पदे यांच्या अनुषंगाने सामावून घेतले जाईल. “तंत्रज्ञ” पदावर रुजू झाल्यानंतर ते मूळ वेतना व्यतिरिक्त महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व इतर भत्ते इत्यादी कंपनीच्या नियमाप्रमाणे मिळण्यास पात्र ठरतील.
◾निवड झालेल्या उमेदवारास रिक्त पद आणि अनुशेष याच्या अनुषंगाने परिमंडळ कार्यालयाकडे सविस्तर पदस्थापनेकरिता वर्ग करण्यात येतील, अशा उमेदवारांना परिमंडळाच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही कार्यालयाच्या ठिकाणी कंपनीच्या निकडीनुसार नियुक्त करण्यात येईल, याबाबत कंपनीचा निर्णय अंतिम राहील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 20 मार्च 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.