Mahavitaran Bharti 2025 : म.रा.वि.वि.कं.मर्या. (महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी) अंतर्गत तारतंत्री / वीजतंत्री (Electrician / Wireman) एकूण 0286 पदाकरीता पात्र उमेदारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. महावितरण मध्ये 10वी व ITI उत्तीर्ण उमेदवारांना काम मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची अधिकृत जाहिरात अधीक्षक अभियंता,म.रा.वि.वि.कं.मर्या. मंडल द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
Mahavitaran Bharti 2025 : Applications have been invited from eligible candidates for a total of 0286 posts of Electrician / Wireman under Maharashtra State Electricity Distribution Company.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : म.रा.वि.वि.कं.मर्या. मंडल द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : विद्युत विभागात काम मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾एकूण पदे : 0286 जागा.
◾पदाचे नाव : तारतंत्री / वीजतंत्री (Electrician / Wireman)
◾शैक्षणिक पात्रता : 10वी व ITI (सबंधित ट्रेड मध्ये) (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : प्रशिक्षण कालावधी एक वर्षाकरीता राहील.
◾इतर आवश्यक पात्रता : उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त आय.टी.आय. वीजतंत्री / तारतंत्री किंवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ यांचा ०२ वर्षे कालावधीचा डिप्लोमा इन इलेक्ट्रीशियन (Diploma in Electrician) उत्तीर्ण असावा. आय.टी.आय. गुणांची अट खुल्या प्रवर्गासाठी किमान 60% व मागासप्रवर्गातील (अ.जा., अ.ज. व इ.मा.व.) उमेदवारांकरीता किमान ५५%. असावी.
◾नोकरी ठिकाण : नाशिक.
◾कागदपत्र जमा करणेपूर्वी www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर ईच्छुक उमेदवाराने नोंदणी करणे आवश्यक आहे.
◾उमेदवाराने आपली शैक्षणिक कागदपत्रे (शाळा सोडल्याचा दाखला, १०वी उत्तीर्णचे प्रमाणपत्र / गुणपत्रक, L.T.I. च्या चारही सत्रांची गुणपत्रिका), अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate), जातीचे प्रमाणपत्र व आधारकार्ड यांच्या साक्षांकित छायांकित प्रती अंतिम तारीख पर्यंत जमा करावे. त्यानंतर सादर केलेले कागदपत्रे कोणत्याही सबबी खाली विचारात घेतले जाणार नाहीत.
◾प्रशिक्षण संपल्यानंतर शिकाऊ उमेदवारांना कंपनीच्या सेवेत सामावून घेणे बंधनकारक नाही याची नोंद घ्यावी.
◾जाहिरातीत बदल किंवा जाहिरातीच्या काही भागात अंशतः बदल किंवा संपूर्ण जाहिरात रद्द करण्याचे अधिकार हे कंपनी राखुन ठेवित आहे व सदरचा निर्णय कोणत्याही प्रकारे उमेदवारास कळविला जाणार नाही.
◾शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रियेदरम्यान उमेदवाराने कोणत्याही दबाव तंत्राचा वापर केल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल.
◾नाशिक जिल्ह्यातील पात्र व ईच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर कागदपत्रे जमा करावी.
◾अंतिम निवड यादी गुणांच्या आधारे तयार करुन प्रसिध्द करण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 04 फेब्रुवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या., नाशिक मंडल कार्यालय, विद्युत भवन, बिटको पॉईंट, नाशिकरोड, नाशिक- ४२२१०१.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.