
जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ मधील प्रकरण ५ मधील कलम २७ तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, २०१८ मधील नियम १५ (१) मध्ये बाल कल्याण समितीची स्थापना करण्याची तरतूद आहे, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, २०१८ चा नियम ९० च्या अन्वये गठित केलेल्या निवड समितीच्या शिफारशी नुसार बाल कल्याण समितीची स्थापना करण्यात येते. तसेच बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५व सुधारीत अधिनियम २०२१ मधील प्रकरण ३ मधील कलम ४ (१) तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, २०१८ मधील प्रकरण २ मधील नियम ३ व ४ अन्वये बाल न्याय मंडळ गठित करण्याची तसेच मंडळाची रचना याबाबतची तरतूद आहे.
त्यानुसार महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, २०१८ च्या नियम ९१ च्या अधिन राहून महाराष्ट्र राज्यातील बाल कल्याण समिती मुंबई उपनगर-१ येथील ०१ अध्यक्ष व ०४ सदस्य पदे तसेच कोल्हापूर येथील ०२ सदस्य, धुळे, यवतमाळ, सोलापूर या जिल्ह्यातील प्रत्येकी ०१ सदस्य पदे अशी एकूण १० पदे वगळून उर्वरित सर्व बाल कल्याण समिती अध्यक्ष/सदस्य या पदाकरिता पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात येत आहेत. व महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, २०१८ च्या नियम ९१ च्या अधिन राहून महाराष्ट्र राज्यातील बाल न्याय मंडळ, गडचिरोली व नागपूर येथील प्रत्येकी १-१ अशासकीय सदस्य व बाल न्याय मंडळ, पुणे (अतिरिक्त) येथील 2 अशासकीय सदस्य असे एकुण 4 पदे वगळून उर्वरित सर्व बाल न्याय मंडळाची जिल्ह्यातील दोन अशासकीय सदस्य पदाकरिता पात्र उमेदवारांचे अर्ज मागविण्यात येत आहेत. सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचा.