पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा (ऑनलाईन अर्ज 14 ऑक्टोंबर 2024 पासून सुरू होतील.) |
महिला व बाल विकास विभाग, पुणे व्दारे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित), परिविक्षा अधिकारी, गट क , लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), वरिष्ठ लिपीक/ सांख्यिकी सहायक, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), वरिष्ठ काळजी वाहक गट-ड, कनिष्ठ काळजी वाहक गट-ड, स्वयंपाकी गट-ड. ही पदे भरली जात आहेत. एकूण 0236 पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागविले जात आहेत.
14 ऑक्टोबर 2024 पासून या भरतीला सुरुवात होणार आहे. उक्त भरती प्रक्रिया/परिक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, त्यामध्ये अंशतः बदल करणे, पदांच्या एकूण किंवा संवर्गनिहाय संख्येमध्ये वाढ किंवा घट करण्याचे, सामाजिक, समांतर, दिव्यांग व इतर आरक्षणामध्ये संवर्गनिहाय / पदनिहाय बदल करण्याचे, सरळ भरती प्रक्रियेच्या जाहिरातीमधील अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचे/नव्याने अटी व शर्ती समाविष्ट करण्याचे/अटी व शर्ती रद्द करण्याचे सर्व अधिकार आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी राखून ठेवले असून त्यांचा निर्णय अंतिम असेल. तसेच भरती प्रक्रियेसंदर्भात वाद, तक्रारीबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना राहतील. त्याबाबत कोणताही दावा सांगता येणार नाही. 03 नोव्हेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.