महाराष्ट्र शासन : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! | वेतन – 16,600 ते 52,400 रूपये.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

महिला व बाल विकास विभाग अंतर्गत वरिष्ठ काळजी वाहक गट-ड, कनिष्ठ काळजी वाहक गट-ड, स्वयंपाकी गट-ड, संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित), परिविक्षा अधिकारी, गट क , लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), वरिष्ठ लिपीक/ सांख्यिकी सहायक, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) ही एकूण 236 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना संपूर्ण महाराष्ट्र मध्ये नियुक्ती दिली जाणार आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरतीसाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करा. अर्ज फी: खुला वर्ग: ₹1000/-, मागास वर्ग: ₹900/-. 14 ऑक्टोबर 2024 रोजी पासून या भरतीला सुरुवात झाली आहे. नियम व अटी : प्रस्तुत भरती प्रक्रियेकरीता केवळ उक्त नमुद संकेस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीनेच भरलेला अर्ज व ऑनलाईन पध्दतीनेच भरण्यात आलेले परीक्षा शुल्क ग्राहय धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज / परीक्षा शुल्क ग्राहय धरण्यात येणार नाही. उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज ऑनलाईन शुल्क भरण्यापुर्वी सदरच्या सविस्तर जाहिरातीचे काळजीपूर्वक अवलोकन करुन आपण सदर पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहोत किंवा कसे याबाबतची खात्री करावी. तदनंतरच अर्ज व परीक्षा शुल्क भरावे. सदर परीक्षा शुल्क हे ना परतावा राहील व कोणत्याही कारणास्तव ते उमेदवारास परत करण्यात येणार नाही. ऑनलाईन शुल्क भरताना उमेदवारास परीक्षा शुल्का व्यतिरिक्त संबधीत बँकेचे नियमानुसार शुल्क चार्जेस भरावे लागतील.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नमुद केलेली शैक्षणिक अर्हता, वय, अधिवास, जात, उन्नत प्रगत गटात मोडत नसणे, महिला, खेळामधील प्राविण्य, प्रकल्पग्रस्त, भुंकपग्रस्त, माजी सैनिक, अनाथ, दिव्यांग व इतर बाबी सिध्द करणे ही सर्वस्वी जबाबदारी उमेदवाराची राहील. यापैकी संबधीत उमेदवारास लागु असलेली/ऑनलाईन अर्जात नमुद केलेली कोणतीही बाब उमेदवार सिध्द करुन शकल्यास अशा उमेदवाराची निवड भरती प्रक्रियेच्या/शासकीय सेवेच्या कोणत्याही टप्यावर रद्य करण्याचे अधिकार आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी राखून ठेवले आहेत. उक्त नमुद पदांच्या सरळसेवा भरती प्रक्रियेबाबतच्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करुनच ऑनलाईन अर्ज सादर करावा. उमेदवारांचे अर्ज केवळ ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारण्यात येणार असल्याने उमेदवारांनी त्यांचे पात्रतेनुसार काळजीपूर्वक, खरी व अचूक माहिती भरणे आवश्यक आहे. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रूटी राहील्याने भरती प्रक्रियेच्या शासकीय सेवेच्या कोणत्याही टप्यांवर त्यांचा अर्ज निवड नाकारली गेल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबधित उमेदवाराची राहील. ऑनलाईन अर्जात नमुद केलेली माहिती भरती प्रक्रियेच्या /शासकीय सेवेच्या कोणत्याही टप्यावर बदलता येणार नाही व त्याबाबत उमेदवारास तक्रार करता येणार नाही. 03 नोव्हेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.


error: Content is protected !!