Mahila Balvikas Vibhag Bharti 2024 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना, अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) शहर आणि महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे अधिनस्त असलेली रिक्त पदे भरती करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून खालील अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. महिला व बालविकास विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात बाल विकास प्रकल्प अधिकारी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Mahila Balvikas Vibhag Bharti 2024 : Eligible candidates are requested to apply in the prescribed format as per the following terms and conditions for recruitment of vacant posts under the Integrated Child Development Services Scheme, Internal Child Development Project Officer (Urban) City and Women Child Development Project Officer.
◾भरती विभाग : बाल विकास प्रकल्प अधिकारी, महिला व बालविकास विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : महिला व बालविकास विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
◾भरत श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
◾Pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾ मासिक / वेतन : 5500/- रुपये महिना.
◾वयोमर्यादा : १८ ते 40 वर्ष पर्यंत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव : अंगणवाडी मदतनिस हे रिक्त पदे भरण्यात येणार आहेत
◾नोकरी ठिकाण : नाशिक (Jobs in Nashik)
◾उमेदवार महिला स्थानिक रहिवाशी असावी. स्थानिक रहिवाशी म्हणजेच ज्या शहरातील अंगणवाडी मदतनिस पदासाठी अर्ज केलेला असेल त्याच शहरातील (महनगरपालिका नगरपालिका/ नगरपरिषद/ नगरपंचायत क्षेत्रातील) रहिवाशी असणे आवश्यक आहे. यासाठी रहिवाशी दाखला म्हणून शासकिय दस्तऐवज (जसे आधारकार्ड/मतदान ओळखपत्र/ तहसिलदार/वार्ड अधिकारी यांचा रहीवाशी दाखला इ.) जोडणे आवश्यक आहे.
◾अंगणवाडी मदतनिस या पदासाठी वयोमर्यादा किमान १८ वर्षे व कमाल ३५ वर्षे राहिल. तसेच विधवा उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे राहिल. त्याकीरता शाळा सोडल्याचा दाखला/ १०वी उत्तीर्ण बोडांचे प्रमाणपत्र/ जन्म नोंद दाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक राहील. उमेदवाराचे किमान व कमाल वय हे जाहिरात प्रसिध्दीच्या दिनांकास गणण्यात येईल.
◾लहान कुटुंब मधील पदासाठी अर्ज करणा-या उमेदवारांस लहान कुटुंबाची अट लागू राहिल. उमेदवारांस दोन पेक्षा जास्त हयात अपत्ये (दत्तक दिलेल्या अपत्यांसह) नसावीत. अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात लहान कुटुंबाबाबतचे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक राहिल. अन्यथा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
◾मागासवर्गीय असल्यास सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची प्रत जोडावी.
◾उमेदवार विधवा असल्यास पतीचे मृत्यु नोंदणी प्रमाणपत्र जोडावे.
◾एका उमेदवाराने एकच अर्ज सादर करावा. उमेदवाराने वेगवेगळे अर्ज सादर केल्यास एकच अर्ज विचारात घेण्यात येईल व त्याबाबत उमेदवाराशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
◾उमेदवारांनी अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांवरुन इयत्ता १०वी/१२वी/पदवी/पदव्युत्तर पदविका/डिएड/बीएड/संगणक परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र यामध्ये त्यांना मिळालेल्या गुणांनुसार तसेच विधवा/अनाथ, जात प्रवर्ग, अनुभव इ.साठी त्यांचे प्रमाणपत्रांवरुन मिळालेल्या एकूण गुणांनुसार गुणानुक्रमाने पात्र उमेदवारांची शहरातील रिक्त पदांच्या संख्येनुसार निवड करण्यात येईल.
◾शेवटची दिनांक : 10 ऑगस्ट 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), जिल्हा नाशिक यांचे कार्यालय, सिल्वर मून, फ्लॅट नंबर १, ड्रीम सिटी जवळ, सहकार नगर, रामदास स्वामी मार्ग, नाशिक – ४२२००६
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.