Mahila Balvikas Vibhag Bharti 2024 : महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त आस्थापनेवरील गट-ब अराजपत्रित गट-क व गट-ड या संवर्गातील लघुलेखक (उच्चश्रेणी), गट-क लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क वरिष्ठ लिपीक सांख्यिकी सहायक, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-ड पदे स्वयंपाकी, व ईतर रिक्त पदासाठी मंडळाच्या कक्षेतील सरळसेवा कोटयातील रिक्त असलेली पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडुन केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी 10वी, 12वी, पदवीधर उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. भरतीची जाहिरात महिला व बाल विकास विभाग आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
Mahila Balvikas Vibhag Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates to fill up the vacant posts in direct service quota for the vacant posts in Women and Child Development Department through online mode only.
◾भरती विभाग : महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : महिला व बाल विकास विभाग सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवा.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : वरिष्ठ काळजी वाहक, कनिष्ठ काळजी वाहक, स्वयंपाकी, संरक्षण अधिकारी, परिविक्षा अधिकारी, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), वरिष्ठ लिपीक/ सांख्यिकी सहायक, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ),
◾शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी / पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾मासिक वेतन : 16,600 ते 52,400 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾पूर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज फी :
▪️खुला वर्ग : 1000/- रुपये.
▪️मागास वर्ग : 900/- रुपये.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️वरिष्ठ काळजी वाहक गट-ड :
1] माध्यमिक शालांन्त परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] उमेदवार हा सुदृढ शरीरयष्टीचा असणे आवश्यक आहे.
▪️कनिष्ठ काळजी वाहक गट-ड :
1] माध्यमिक शालांन्त परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] उमेदवार हा सुदृढ शरीरयष्टीचा असणे आवश्यक आहे.
▪️स्वयंपाकी गट-ड :
1] माध्यमिक शालांन्त परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] उमेदवार हा सुदृढ शरीरयष्टीचा असणे आवश्यक आहे.
▪️संरक्षण अधिकारी गट-ब :
1] सांविधिक विद्यापीठाची समाज कार्य विषयामधील पदव्युत्तर पदवी धारण करणे आवश्यक राहील.
2] समाज कार्य विषयासंबधीत किमान तीन वर्षाचा अनुभव.
▪️परिविक्षा अधिकारी, गट क :
1] सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण करणे आवश्यक राहील.
▪️लघुलेखक (उच्चश्रेणी) गट-क :
1] माध्यमिक शालांन्त परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] लघुलेखनाचा किमान वेग 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनीट किंवा मराठी टंकलेखनाचा किमान वेग 30 शब्द प्रति मिनीट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.
▪️वरिष्ठ लिपीक सहायक, गट-क :
1] सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण करणे आवश्यक राहील.
▪️संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट-क :
1] सांविधिक विद्यापीठाची कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, समाज कार्य, गृहविज्ञान किंवा पोषण आहार यापैकी कोणत्याही विषयातील पदवी किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषीत केलेली इतर कोणतीही अर्हता धारण करणे आवश्यक राहील. परंतु संविधानिक विद्यापीठाची विधी, समाजकार्य, मानसशास्त्र किंवा समाजशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी धारण करणा-या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
▪️लघुलेखक (निम्मश्रेणी) गट-क :
1] माध्यमिक शालांन्त परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2] लघुलेखनाचा किमान वेग 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनीट किंवा मराठी टंकलेखनाचा किमान वेग 30 शब्द प्रतिमिनीट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.
◾रिक्त पदे : 0236 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात.
◾उमेदवारांनी ऑनलाईन अर्जात नोंदविलेले ईमेल आयडी किंवा मोबाईल क्रमांक चुकीचा / अपुर्ण असल्यास, मोबाईल क्रमांक NCPR रजिस्टर्ड (DND) असल्यामुळे संपुर्ण भरती प्रक्रीये दरम्यान उमेदवारांना ईमेल / एसएमएस व्दारे पाठविण्यात येणाऱ्या सूचना / संदेश / माहिती संबधित उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबधित उमेदवाराची राहील.
◾ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्यातील माहिती परिपूर्ण भरून विहीत मुदतीत परीक्षा शुल्क भरलेल्या उमेदवारांची स्थिती, सरळसेवा भरती प्रक्रियेची रुपरेषा वेळापत्रक / परीक्षा केंद्र / बैठक क्रमांक / प्रवेशपत्र इत्यादीबाबतची माहिती उक्त नमुद संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
◾शेवटची दिनांक : 03 नोव्हेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.