महिला व बालविकास विभाग मध्ये नवीन पदांची भरती! पात्रता – 12वी उत्तीर्ण | Mahila Balvikas Vibhag Bharti 2024

Bharti 2023 : महिला व बालविकास विभाग व्दारे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी मदतनीस या पदासाठी खाली नमूद रिक्त असलेल्या जागा भरावयाच्या असल्याने उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय व परिपत्रकास अनुसरून खालील नमूद ग्रामपंचायती मधील संबंधित महसुली गावातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडून दि. ११/०३/२०२४ ते दि. २२/०३/२०२४ या कालावधीत (सुट्टीचे दिवस वगळून) विहित नमुन्यातील परिपूर्ण अर्ज कार्यालयीन वेळेत मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात एकात्मिक बालविकास सेवा योजना द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्रता ही 12वी उत्तीर्ण आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾भरती विभाग : महिला व बालविकास विभाग अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾भरती प्रकार : सरकारी (Government) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस
◾शैक्षणिक पात्रता : अंगणवाडी मदतनीस या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) अशी राहील. अर्जदाराने त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार (१२वी, पदवीधर, पदव्युतर,डी.एड./बी.एड, एम.एस.सी.आय.टी (MS-CIT), शासनाने वेळोवेळी समकक्ष ठरविलेला संगणक आभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र इ. त्याची गुणपत्रके /प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील.
◾या भरतीची अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) अर्ज करावा लागेल.
◾वयोमर्यादा : अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदावर नियुक्तीसाठी वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे अशी राहील. तथापि विधवा उमेदवारांसाठी हि वयोमर्यादा कमाल ४० वर्षे अशी राहील. अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे वय दिनांक २२/०३/२०२४ रोजी १८ वर्षे पेक्षा कमी व ३५ वर्षे पेक्षा जास्त नसावे.
◾भरती कालावधी : पर्मनंट (Permanent) नोकरी.
◾वेतन : अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदासाठी केंद्र/राज्य शासनाने वेळोवेळी निश्चित केलेले मानधन व इतर लाभ देण्यात येतील, सदरील नेमणुका ह्या अस्थायी स्वरूपाच्या व मानधनी स्वरूपाच्या आहेत.
◾रिक्त पदे : 40 पदे भरली जात आहेत.
◾नोकरी ठिकाण : सुरगाणा, नाशिक (Jobs in Nashik)
◾वास्तव्याची अट (स्थानिक रहिवासी असणे) : अंगणवाडी मदतनीस या मानधनी पदावर फक्त त्या गावातील ग्रुप ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव/वाडी/वस्ती/पाडे यासह रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जासोबत अर्जदार हा त्या महसुली गावाचा रहिवासी असलेबाबतचा मा. तहसिलदार, सुरगाणा यांचा रहिवासी दाखला प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील.
◾लहान कुटुबाची अट : अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी पदासाठी लहान कुटुंबाची अट लागू राहील. लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवारास जास्तीत जास्त दोन ह्यात अपत्ये उमेदवाराला दोन ह्यात अपत्यपेक्षा (दत्तक दिलेल्या अपत्यासह) अधिक अपत्य असल्यास उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही जर सदर बाब नियुक्तीनंतर निदर्शनास आल्यास उमेदवाराला सेवेतून तात्काळ सेवामुक्त करण्यात येईल.
◾अनुभव : अंगणवाडी सेविका/मदतनीस/मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी ०२ वर्षाचा अनुभव असल्यास ५ अतिरिक्त गुण देण्यात येतील त्यासाठी फक्त बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे प्रमाणपत्र ग्राह्य राहील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 22 मार्च 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, सुरगाणा ०१, ता. सुरगाणा जि. नाशिक.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!