Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 : महिला व बालविकास विभाग महानगरपालिका हद्दीतील स्थानिक महिला उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी! १२वी उत्तीर्ण महिलांसाठी अंगणवाडी मदतनीस पदावर भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील तपशील वाचून अर्ज करावेत. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली उपलब्ध करून देण्यात आला आहे.
Mahila Balvikas Vibhag Bharti 2025 : A golden opportunity for local female candidates within the Women and Child Development Department Municipal Corporation limits! Recruitment has been announced for the post of Anganwadi Helper for 12th pass women. Interested and eligible candidates should read the following details and apply.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : महिला व बालविकास विभाग.
◾भरती प्रकार : सरकारी विभागातील भरती.
◾भरती श्रेणी : राज्य शासन श्रेणी.
◾नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी.
◾पदाचे नाव : अंगणवाडी मदतनीस.
◾शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाद्वारे 12वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
◾अधिकृत जाहिरात व अर्ज खाली पहा.
📑 Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
🧾 अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीनें अर्ज सादर करू शकणार आहेत.
◾अर्जासोबत १२वीचे सर्व गुणपत्रके सादर करणे आवश्यक आहे. उच्च शिक्षण घेतलेल्या (पदवी, पदव्युत्तर पदवी) उमेदवारांनीही संबंधित प्रमाणपत्रे व संगणक शिक्षण (MS-CIT) प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.
◾वयोमर्यादा:
1) सर्वसाधारण उमेदवार : 18 ते 35 वर्षे.
2) विधवा महिला उमेदवार : 40 वर्षांपर्यंत सवलत.
◾अर्ज करण्याची पद्धत: अर्ज फक्त ऑफलाईन स्वरूपात स्वीकारले जातील.
◾उमेदवाराने स्वतः उपस्थित राहून कार्यालयात अर्ज सादर करणे अनिवार्य आहे.
◾पोस्टाव्दारे आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
◾एकूण पदे : 33 जागा.
◾नोकरी ठिकाण : लातूर शहर महानगरपालिका हद्द.
◾अर्जाची शेवटची तारीख: 02 मे 2025 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करावा. सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता: बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी, लातूर शहर, त्रिमूर्ती भवन, पहिला मजला, उदय पेट्रोलपंप बाजूला, बार्शी रोड, लातूर.
◾महत्वाचे निर्देश:
1) उमेदवार फक्त लातूर महानगरपालिका हद्दीतील स्थानिक रहिवासी असावा.
2) सर्व शैक्षणिक व इतर आवश्यक प्रमाणपत्रांची साक्षांकित प्रती अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे.
3) अर्ज सादर करताना सर्व आवश्यक माहिती पूर्णपणे भरलेली असावी.
4) अर्जात दिलेली माहिती चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येऊ शकते.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.