Anganwadi Bharti 2025 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या नियंत्रणाखालील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. संबंधित महसुली गावांमधील पात्र महिला उमेदवारांकडून ठराविक कालावधीत अर्ज मागवले जात आहेत. ही भरती सरळ नियुक्तीद्वारे होणार असून, अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात नीट वाचणे आवश्यक आहे. खाली PDF जाहिरात आणि अर्जासंबंधी सर्व माहिती दिली आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प कार्यालयात ही भरती जाहीर करण्यात आली आहे. उमेदवाराने किमान 12वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. (अधिक तपशीलांसाठी अधिकृत जाहिरात वाचा.) अधिकृत जाहिरात व माहिती : PDF जाहिरात खाली उपलब्ध आहे. उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. या भरतीसाठी वयोमर्यादा ही मदतनीस पदासाठी वय किमान 18 आणि कमाल 35 वर्षांपर्यंत आहे. विधवा उमेदवारांसाठी कमाल वयमर्यादा 40 वर्षे राहील.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत.
◾स्थानिक अटी : अर्जदार महिला ही संबंधित अंगणवाडी केंद्र असलेल्या महसुली गावाची रहिवासी असावी. ग्रामपंचायतीच्या मर्यादेत नव्हे, तर त्या महसुली गावातील वस्ती, वाडी किंवा पाड्यात राहणारी असावी. अर्जासोबत रहिवासी पुरावा आणि स्वतःची घोषणापत्र जोडणे आवश्यक आहे.
◾नोकरी ठिकाण : बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी), प्रकल्प नंदुरबार.
◾अर्ज सादर करण्याचे ठिकाण : एकात्मिक बाल विकास सेवा योजना, म्हसावद, ता. शहादा या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन अर्ज सादर करावा.
◾अर्ज कालावधी :
1) अर्ज स्वीकारण्याची मुदत 24 ऑक्टोबर 2025 ते 07 नोव्हेंबर 2025 दरम्यान आहे.
2) अर्ज फक्त कार्यालयीन वेळेत आणि सुट्टीचे दिवस वगळूनच स्वीकारले जातील. ठराविक वेळेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
