PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बाल हक्क संरक्षण आयोग मधील तरतुदीनुसार व बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोग नियम मधील दुरुस्तीमध्ये नमूद निकषांचा समावेश करुन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगावर अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी राज्यातून नामांकने मागविण्यात येत आहेत. एकूण रिक्त पदे ही 07 पदे भरली जात आहेत.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. 02 जानेवारी 2025 पासून अर्ज सुरू झाले आहेत. वर नमूद केलेल्या पदांसाठी दिलेल्या अटींची पुर्तता करणा-या इच्छुक व्यक्तींनी आपले खालील विहित नमुन्यातील अर्ज वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर तत्सम कागदपत्रासह जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसाचे आत आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, २८- राणीचा बाग, जुन्या सर्किट हाऊस जवळ, महाराष्ट्र राज्य, पुणे-१ यांच्या कार्यालयात सादर करावे.
या भरतीची सविस्तर जाहिरात शासनाच्या www.maharashtra.gov.in व आयुक्तालयाच्या www.wedcommpune.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 जानेवारी 2025 ही आहे. तर ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता आयुक्त कार्यालय, महिला व बाल विकास आयुक्तालय, 28- राणीची बाग, जुन्या सर्किट हाऊसजवळ, महाराष्ट्र राज्य, पुणे-1 हा आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात पहा.