महसूल व वनविभाग अंतर्गत भरती 2025 | Mahsul Vanvibhag Bharti 2025

Mahsul Vanvibhag Bharti 2025 : महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरणाच्या मुख्य खंडपीठ बृहन्मुंबई, खंडपीठ पुणे, खंडपीठ छत्रपती संभाजीनगर व खंडपीठ नागपूर येथील रिक्त असलेल्या किंवा संभाव्य रिक्त होणाऱ्या पदांवरील रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग अंतर्गत प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahsul Vanvibhag Bharti 2025 : Applications are invited from eligible candidates to fill vacant or likely vacant posts in the Principal Bench of Maharashtra Land Revenue Tribunal, Brihanmumbai, Bench Pune, Bench Chhatrapati Sambhajinagar and Bench Nagpur.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात काम मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिक माहिती येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाइन (ई-मेल) / ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 62 वर्षा पर्यंत.
पदाचे नाव : अध्यक्ष, सदस्य (न्यायिक व प्रशासकीय).
इतर आवश्यक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरणाचे अध्यक्ष, सदस्य (न्यायिक व प्रशासकीय) यांच्या अर्हता, त्यांच्या पदाची मुदत, सेवेच्या अटी व शर्ती, तसेच नियुक्तीची प्रक्रिया हो महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरण नियम, २०२५ मध्ये नमूद केल्यानुसार असेल.
◾वेतन, भत्ते व इतर सेवाशर्ती या पुढील शासन निर्णयांमधील तरतुराप्रमाणे असतील.
◾यापूर्वी नमूद केलेल्या कार्यपध्दतीनुसार, महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरणाच्या उक्त नमूद केल्यानुसार रिक्त असलेल्या किंवा संभाव्य रिक्त होणाऱ्या अध्यक्ष, सदस्य (न्यायिक व प्रशासकीय) या पदांवरील नियुक्तीसाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी कोणत्याही एका रिक्त पदासाठी एक अर्ज याप्रमाणे त्यांचा तपशिल सोबत जोडलेल्या विहीत प्रपत्र व जोडपत्रात भरुन बंद लिफाफ्यात सादर करावा. लिफाफ्यावर “महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरण, अध्यक्ष / सदस्य न्यायिक / सदस्य प्रशासकीय) पदासाठी अर्ज” असे लिहून पोस्टाने दिलेल्या पत्त्यावर किंव्हा ई-मेल पत्त्यावर ई-मेलद्वारे अंतिम तारीख पर्यंत पोहचतील अशाप्रकारे पाठवावेत.
◾राज्य/केंद्र शासन किंवा अन्य कोणत्याही संघटनेत सेवेत असलेल्या व्यक्तींनी त्यांचा तपशील विहित मार्गाने (प्रशासकीय मंत्रालय / विभाग / राज्य / केंद्रशासित प्रदेश यांचे मार्फत) अंतिम दिनांकापूर्वी पाठवावा.
◾अध्यक्ष व सदस्य, राज्य शासनाकडून विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा, तीन वर्षांपेक्षा अधिक नसेल इतक्या कालावधीसाठी पद धारण करतील.
◾अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून नियुक्त केलेली कोणतीही व्यक्ती, पासष्ट वर्षे वयाची झाल्यानंतर, अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून पद धारण करणार नाही.
◾अध्यक्षास किंवा कोणत्याही सदस्यास, स्वतःच्या सहीनीशी राज्य शासनाला उद्देशून, कोणत्याही वेळी, लेखी स्वरुपात, आपल्या पदाचा राजीनामा देता येईल आणि त्याचा राजीनामा, ज्या तारखेस स्वीकारण्यात येईल त्या तारखेपासून अंमलात येईल.
◾या नियमात काहीही अंतर्भूत असले तरी, जर शासनाचे, असा अध्यक्ष किंवा सदस्य, त्याच्या पदाची कर्तव्ये पार पाडण्यास असमर्थ किंवा अपात्र आहेत असे मत असेल तर, शासनास, अशा अध्यक्षाची किंवा कोणत्याही सदस्याची नियुक्ती, कोणत्याही वेळी समाप्त करता येईल.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : उप सचिव, कार्यासन ज-१अ, महसूल व वन विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
ई-मेल पत्ता : jla.revenue@maharashtra.gov.in
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!