माझी लाडकी बहिण योजना ऑनलाईन अर्ज सुरू!| असा करा ऑनलाईन अर्ज.| | Majhi Ladki Bahin Yojana GR

Majhi Ladki Bahin Yojana GR : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजने अंतर्गत महिलांना 1,500 रूपये दरमहा सहाय्य दिले जाणार आहे. 1 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध केल्याला GR मधील अटी बदल करून नवीन माहिती प्रसिद्ध केली आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ॲप्लिकेशन सुद्धा जाहीर करण्यात आले आहे. या योजनेचा पुर्ण नवीन GR व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ॲप्लिकेशन लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Majhi Ladki Bahin Yojana GR : प्रत्येक पात्र महिलेला तिच्या बँक खात्यात दरमहा रु.१,५००/- इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र/राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेव्दारे रु.१,५००/- पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेव्दारे महिलेस देण्यात येईल. महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६० या वर्ष वयोगटातील मुली, विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेचा पुर्ण नवीन GR व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ॲप्लिकेशन लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता :
(१) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
(२) राज्यातील मुली, विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला.
(३) किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत.
(४) सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
(५) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.२.५० लाखापेक्षा जास्त नसावे.
या योजनेचा पुर्ण नवीन GR व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ॲप्लिकेशन लिंक खाली दिली आहे.

ऑनलाईन अर्ज
करण्यासाठी
ॲप्लिकेशन लिंक
येथे क्लीक
करा
माझी लाडकी
बहिण योजना

पुर्ण GR
पाहण्यासाठी
येथे क्लीक
करा

◾सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत:-
(१) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
(२) लाभार्थ्याचे आधार कार्ड.
३) डोमेसाईल नसेल तर 1]शाळा सोडल्याचा दाखला किंवा 2]मतदान कार्ड किंवा 3] रेशनकार्ड किंवा 4]जन्म दाखला या 4 पैकी एक कागदपत्र.
(४) सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला. जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड.
(५) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
(६) पासपोर्ट आकाराचा फोटो.
(७) फोटो.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 1 जुलै 2024 तर अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक ही 31 ऑगस्ट 2024 ही आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेला GR पहा.

error: Content is protected !!