महिलांना मिळणार दरमहा 1,500 रूपये! | माझी लाडकी बहिण योजना नवीन GR येथे उपलब्ध.

नवीन GR येथे क्लीक
करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
ॲप्लिकेशन लिंक
येथे क्लीक
करा
माझी लाडकी
बहिण योजना जुना GR
पाहण्यासाठी
येथे क्लीक
करा

तुम्ही महिला असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. महाराष्ट्र शासन द्वार माझी लाडकी बहिण योजना GR प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामधे दिलेल्या माहिती प्रमाणे महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाणे ५० पेक्षा जास्त आहे. तसेच राज्यातील श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी ५९.१० टक्के व स्त्रीयांची टक्केवारी २८.७० टक्के इतकी आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, महिलांच्या आर्थिक, आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यासाठी ही योजना राबविली जात आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या योजनेद्वारे महिलांना 1,500 रूपये प्रत्येक महिन्याला दिले जाणार आहेत. महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना सुरू करण्यात आली आहे. अर्ज सुरू होण्याची दिनांक ही 01 जुलै 2024 तर अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक ही 31 ऑगस्ट 2024 ही आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेला GR पहा.

error: Content is protected !!