महाराष्ट्र शासन : गट-ड संवर्गातील पदभरती | शैक्षणिक पात्रता – 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण | वेतन – 19,900 ते 63,200 रुपये.

📑 pdf
जाहिरात
येथे क्लीक करा
🌐 ऑनलाईन
अर्ज
येथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी उत्तम संधी! डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड येथे विविध गट-ड संवर्गातील पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीद्वारे एकूण ८६ पदे भरली जाणार आहेत.

रिक्त पदांचा समावेश: शिपाई, धोबी, शिंपी, स्ट्रेचर बेअरर, स्वयंपाकी, स्वयंपाकी सहाय्यक, एक्स-रे सर्व्हंट, कॅस्युलटी सर्व्हंट, टेबल बॉय, डिस्पेंसरी सर्व्हंट, पुरुष सेवक, मेस सर्व्हंट, आया, वॉचमन, नर्सिंग असिस्टंट, माळी, क्लिनर, प्रयोगशाळा सेवक आणि प्रयोगशाळा परिचर.
शैक्षणिक अर्हता:
1) बहुतेक पदांसाठी किमान १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2) उमेदवाराला मराठीचे ज्ञान असणे बंधनकारक आहे.
वयोमर्यादा:
1) खुल्या प्रवर्गासाठी कमाल वय ३८ वर्षे,
2) राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षांपर्यंत सवलत देण्यात आली आहे.
वेतनश्रेणी: गट-ड पदांकरिता एस-१ वेतन श्रेणी ₹१५,००० – ₹४७,६००.
प्रयोगशाळा परिचर पदाकरिता एस-६ वेतन श्रेणी ₹१९,९०० – ₹६३,२०० निश्चित.

अर्ज प्रक्रिया:
1) अर्ज फक्त ऑनलाईन माध्यमातून स्वीकारले जातील.
2) अर्ज करण्याची अंतिम तारीख: १६ मे २०२५.
◾नोकरीचे ठिकाण: सर्व पदांसाठी नियुक्ती नांदेड जिल्ह्यातील संस्थेत होणार आहे.
पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत आपले अर्ज निश्चितपणे सादर करावेत.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप Follow करा ➤ MN Nokari Logo