
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
सरकारी नोकरी शोधताय? महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा (MIDC) च्या आस्थापनेवरील विविध तब्बल 0749 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील पदे भरली जात आहेत. त्यामध्ये लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-२), वीजतंत्री (श्रेणी-२), पंपचालक (श्रेणी-२), जोडारी (श्रेणी-२), सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्र चालक, अग्निशमन विमोचक व वीजतंत्री श्रेणी २ (ऑटोमोबाईल) व इतर पदे भरली जात आहेत. या पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात येतील. ऑनलाईन परीक्षेची तारीख महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळा (MIDC) च्या अधिकृत वेबसाईटवर स्वतंत्रपणे प्रकाशित होईल.
पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांकडून https://ibpsonline.ibps.in/midcaug23/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. उत्सुक उमेदवारांनी www.midcindia.org या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात वाचून ऑनलाईन (Online) पध्दतीनेच आपले अर्ज सादर करावेत. या भरती संदर्भात अधिक माहिती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.