PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवरील गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘कः संवर्गातील कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता, सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, लघुलेखक, लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक, वीजतंत्री, पंपचालक, जोडारी, सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, अग्निशमन विमोचक व इतर पदे सरळसेवेने भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने दिनांक २ सप्टेंबर, २०२३ पासून ते दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यानंतर सदर वेबलिंक बंद होईल. वरील पदांकरीता पात्र असणारे महाराष्ट्र राज्यातील तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषिक उमेदवारही अर्ज करु शकतील. सदर पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने परीक्षा घेण्यात येतील. ऑनलाईन परीक्षेची तारीख महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येईल.
सरळसेवेने भरावयाच्या पदाकरीता महामंडळाच्या www.midcindia.org या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांनी www.midcindia.org या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात वाचून त्याप्रमाणे विहित मुदतीत ऑनलाईन (Online) पध्दतीनेच www.midcindia.org या संकेतस्थळावर आपले अर्ज सादर करावेत. ऑनलाईन पध्दतीने भरलेल्या अर्जाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. सदर संकेतस्थळास भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरतीप्रक्रिये संबंधित आवश्यक ती अद्ययावत माहिती प्राप्त करुन घेण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.