
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
चांगल्या वेतनाची तसेच महाराष्ट्र शासनची नोकरी शोधताय? महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत गट ब संवर्गतील पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये सहाय्यक निबंधक ही एकूण 15 पदे भरली जात आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन स्तर एस-१६ रुपये ४४,९००/- ते रुपये १,४२,४००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते दिले जाणार आहेत. या भरतीसाठी वयोमर्यादा: अराखीव (खुला): 19 वर्षे – 38 वर्षे, मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 19 वर्षे – 43 वर्षे. असणार आहे. तर अर्ज शुल्क: खुला वर्ग- रु. ३९४/-, मागासवर्गीय / आर्थिकदृष्ट्या दुर्बल विभाग / अनाथ / अपंग- रु. २९४/- रूपये असेल.
तुम्ही पात्र असाल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहेत. नियम व अटी : परीक्षा शुल्काचा भरणा केल्यानंतर उमेदवाराला त्याच्या प्रोफाईलमध्ये परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वी झाला आहे किंवा कसे, याची स्थिती (Status) लगेचच अवगत होईल. खात्यातून Logout होण्यापूर्वी परीक्षा शुल्क यशस्वीपणे भरले असल्याबाबत व बँकेकडून व्यवहार (Transaction) पूर्ण झाला असल्याबाबत खात्री करण्याची जबाबदारी उमेदवाराची आहे. कोणत्याही कारणामुळे विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वीपणे करणे शक्य न झाल्यास अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकानंतर दोन दिवसापर्यंत परीक्षाशुल्काचा भरणा ऑफलाईन पद्धतीने करण्याकरीता चलनाची प्रत घेता येईल.
या पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तीने निर्धारित केलेली विभागीय परीक्षा पास होणे आणि परिवीक्षा कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण करणे आवश्यक राहील. विहित कालावधीत विभागीय परीक्षा उत्तीर्ण न केल्यास किंवा परिवीक्षाधीन कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण न केल्यास किंवा त्याला परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळालेली नसल्यास किंवा तो त्या पदासाठी पात्र नसल्याचे आढळून आल्यास तो सेवा समाप्त करण्यास पात्र राहील. विभागीय परीक्षा आणि हिंदी व मराठी भाषा परीक्षा अगोदरच उत्तीर्ण झालेली नसेल किंवा त्याला परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळालेली नसेल तर त्याने सदर परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
परिविक्षा कालावधी यशस्वीरित्या पूर्ण केला नाही किंवा विहित विभागीय परीक्षा उत्तीर्ण केली नाही किंवा त्या पदाकरीता तो/ती योग्य नसल्याचे आढळून आले तर सूचना न देता त्याची/तिची सेवा समाप्त केली जाईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक 10 एप्रिल 2025 ही आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.