MPSC BHARTI 2025 : पशुधन विकास अधिकारी भरती 2025 | आजचं ऑनलाईन अर्ज करा.

MPSC BHARTI 2025 – पशुधन विकास अधिकारी भरती 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिपत्याखालील पशुधन विकास अधिकारी (गट-अ) या पदांसाठी 02,795 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या मंजूरीनुसार मिळालेल्या मागणीपत्राच्या आधारे ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MPSC BHARTI 2025 - पशुधन विकास अधिकारी भरती 2025 : Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced the recruitment of Livestock Development Officer (Group-A) posts under the Agriculture, Animal Husbandry, Dairy Development and Fisheries Department of the Government of Maharashtra.

भरतीचा विभाग व स्वरूप: या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही अधिकृत भरती संस्था असून, ही भरती राज्य सरकारच्या अधिनस्त शासकीय सेवेत कायमस्वरूपी (Permanent) स्वरूपात केली जाणार आहे. ही नोकरी शासनमान्य वेतनश्रेणीसह असून, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये काम करण्याची संधी आहे.
पदाचे नाव व एकूण जागा: या भरतीअंतर्गत एकूण 2,795 रिक्त पदे भरण्यात येणार असून, पदाचे नाव पशुधन विकास अधिकारी (Livestock Development Officer) असे आहे.
वेतनश्रेणी: या पदासाठी शासनमान्य वेतनस्तर प्रमाणे रु. 56,100/- मासिक वेतन देण्यात येईल. यासोबत शासनाच्या धोरणानुसार अन्य भत्तेही लागू होतील.
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
वयोमर्यादा:
उमेदवाराचे वय अर्ज सादर करताना 18 वर्षांपेक्षा कमी व 38 वर्षांपेक्षा अधिक नसावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत लागू आहे.
अर्ज शुल्क:
1) खुला/सामान्य प्रवर्ग: रु. 394/-
2) मागासवर्गीय प्रवर्ग (SC/ST/DT/NT/OBC/EWS): रु. 294/-
शैक्षणिक पात्रता:
उमेदवाराने भारतीय पशुवैद्यक परिषद अधिनियम, 1984 नुसार मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ किंवा पशुवैद्यकीय संस्थेतून Veterinary Science किंवा Veterinary Science and Animal Husbandry या शाखेमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे. संबंधित अर्हता ही अधिनियमाच्या पहिल्या व दुसऱ्या अनुसूचीनुसार असावी.
नोकरीचे ठिकाण: ही नोकरी संपूर्ण महाराष्ट्रभर कोणत्याही जिल्ह्यात दिली जाऊ शकते. उमेदवारांनी महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात सेवा बजावण्याची तयारी ठेवावी.
निवड प्रक्रिया: संबंधित पदासाठी आयोगाच्या धोरणानुसार निवड प्रक्रिया राबवली जाईल. यात ऑनलाईन परीक्षा, कागदपत्र पडताळणी यांचा समावेश असू शकतो. निवड प्रक्रियेबाबत अधिक माहिती आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिली जाईल.
अर्ज पद्धत व अंतिम दिनांक: अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन असून, उमेदवारांना खालील संकेतस्थळांद्वारे अर्ज करावा लागेल:
https://mpsconline.gov.in
https://mpsc.gov.in
◾ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात 29 एप्रिल 2025 पासून होणार असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत 19 मे 2025 आहे. या कालावधीनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
◾उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी https://mpsc.gov.inhttps://mpsconline.gov.in या संकेतस्थळांवरील अधिकृत जाहिरात, सूचना, परिपत्रके आणि विविध मेनू विभागांतील माहितीस काळजीपूर्वक वाचावे. यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आरक्षण, निवड प्रक्रिया, सेवा अटी यांचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. भरतीबाबत कोणतीही गैरसमज अथवा चुकीचा अर्ज केल्यास त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!