
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
शासनाच्या गृह विभागाच्या अधीनस्त राज्य उत्पादन शुल्क विभागातील लिपिक संवर्ग व जवान संवर्गातील कर्मचा-यांना दुय्यम निरीक्षक, गट-क पदावर निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क), गट-क या पदांसाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२३ अंतर्गत एकूण १३७ रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीमध्ये दुय्यम निरीक्षक या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना रु. ३२०००-१०१६०० या आकर्षक वेतनश्रेणीमध्ये नोकरीची संधी मिळेल. हे पद गट-क श्रेणीतील असून महाराष्ट्रात नोकरीचे ठिकाण असेल.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, इच्छुक उमेदवारांनी दिनांक १० जून, २०२५ रोजी दुपारी २ वाजल्यापासून अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून, २०२५ रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत आहे.
अर्ज शुल्कामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. ७१९/- तर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक, अनाथ आणि दिव्यांग उमेदवारांसाठी रु. ४४९/- निश्चित करण्यात आले आहे. ही मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा असल्याने, राज्य उत्पादन शुल्क विभागातील पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. आयोगाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसारच ही जाहिरात तयार करण्यात आली आहे. त्यामुळे, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन सविस्तर माहिती वाचून घ्यावी. ही संधी गमावू नका आणि वेळेत आपला अर्ज सादर करा!