Government Job : महाराष्ट्र लोकसेवा आयोग व्दारे 01333 नवीन रिक्त पदांची भरती सुरू! | MPSC Group C Bharti 2024

MPSC Group C Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण 01333 पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट- क सेवा साठी नवीन रिक्त पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र गट- क सेवा मध्ये रिक्त 01333 पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MPSC Group C Bharti 2024 : Eligible candidates will be selected for the new vacant posts for Maharashtra Group-A service through Maharashtra Public Service Commission through recruitment of total 01333 posts in the following cadre under Miscellaneous Department of Maharashtra Government. For this, applications are invited from the candidates through online mode.

भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन (राज्य सरकार) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : उद्योग निरीक्षक, कर सहायक, तांत्रिक सहायक, बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल (शेरीफ), लिपिक-टंकलेखक.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
मासिक वेतन : 25,500 ते 81,100 रूपये मासिक वेतन मिळेल. (प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.)
◾पूर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 19 ते 38 वर्ष.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
अर्ज शुल्क :
▪️खुला प्रवर्ग : 394/- रुपये.
▪️मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ : 294/- रुपये.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
▪️उद्योग निरीक्षक : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
▪️कर सहायक : 1] पदवीधर 2] मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
▪️तांत्रिक सहायक : पदवीधर असणे आवश्यक आहे.
▪️बेलिफ व लिपिक, गट-क, नगरपाल (शेरीफ), मुंबई यांचे कार्यालय : 1] पदवीधर 2] मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
▪️लिपिक-टंकलेखक : 1] पदवीधर 2] मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
रिक्त पदे : 01333 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात.
◾केवळ प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद विविध संवर्गाच्या संदर्भात पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित/अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येतील.
◾विविध सामाजिक प्रवर्ग, महिला, प्राविण्यप्राप्त खेळाडू, अनाथ इत्यादीसाठी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील.
◾जात संवर्गातील उमेदवारांकरीता शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र, कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.
◾अराखीव (खुला) सर्वसाधारण पदावरील शिफारशीकरीता गुणवत्तेच्या आधारे सर्व उमेदवारांचा (मागासवर्गीय उमेदवारांसह) विचार होत असल्याने, सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित/उपलब्ध नसले तरी, अर्जामध्ये त्यांच्या मूळ प्रवर्गासंदर्भातील माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे, कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे.
◾प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी पात्रतेसंदभर्भातील सर्व मूळ प्रमाणपत्रे सादर न केल्यास शफारस/नियुक्तीसाठी विचार करण्यात येणार नाही.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 04 नोव्हेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!