
MPSC च्या मोठ्या भरतीची वाट पाहत होता? हीच मोठी संधी आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांमध्ये गट-क अंतर्गत पदांची मोठी भरती जाहीर झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक-टंकलेखक या पदांसाठी एकूण 0938 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती कायमस्वरूपी (Permanent) स्वरूपाची असून सरकारी सेवेत प्रवेश मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.
पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अर्ज प्रक्रिया, आवश्यक शैक्षणिक पात्रता, आरक्षण नियम, वयोमर्यादा, परीक्षा योजना आणि अभ्यासक्रम यासंबंधी सर्व माहिती आयोगाच्या https://mpsc.gov.in आणि https://nagacoaline.gov.in या संकेतस्थळांवर दिली आहे. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
या भरतीसाठी पदवीधर उमेदवार पात्र आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹29,200 ते ₹92,300 वेतन दिले जाईल. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 ऑक्टोबर 2025 आहे. उमेदवारांचे वय 55 वर्षांपर्यंत स्वीकारले जाणार आहे. ही भरती महाराष्ट्रातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये होणार असून, महाराष्ट्रातच नोकरीचे ठिकाण राहील. इच्छुकांनी दिलेल्या तारखेत अर्ज सादर करून आपली पात्रता निश्चित करावी आणि अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.