
📑 Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
MPSC Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या मागणीनुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत ‘पशुधन विकास अधिकारी’ (Livestock Development Officer) गट-अ पदासाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
या भरती प्रक्रियेत एकूण 2,795 पदे भरली जाणार असून, उमेदवारांना 56,100 रुपये मासिक वेतन देण्यात येईल. अर्ज प्रक्रिया 29 एप्रिल 2025 पासून सुरू होणार असून 19 मे 2025 ही अंतिम मुदत आहे. शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने भारतीय पशुवैद्यक परिषद अधिनियम, 1984 अन्वये मान्यताप्राप्त विद्यापीठातून पशुवैद्यक शास्त्र (Veterinary Science) किंवा पशुवैद्यक शास्त्र व पशुधन व्यवस्थापन (Veterinary Science and Animal Husbandry) या विषयातील पदवीधर असणे आवश्यक आहे.
◾वयोमर्यादा: 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांना शिथिलता देण्यात येईल).
◾अर्ज शुल्क:
1) खुल्या प्रवर्गासाठी – 394 रुपये
2) मागासवर्गीय उमेदवारांसाठी – 294 रुपये
◾नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रभर राहील आणि ही कायमस्वरूपी नोकरी आहे.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज लिंक व सविस्तर माहिती आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://mpsc.gov.in व https://mpsconline.gov.in येथे उपलब्ध आहे.
◾महत्वाची सूचना: अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत जाहिरात व सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.