PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
सरकारी नोकरी शोधताय? महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट-ब अंतर्गत एकूण 480 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये सहायक कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक ही पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
नियम व अटी : संबंधित संवर्गातील नियुक्तीकरीता शिफारस पात्र उमेदवारांची शारीरिक मोजमापे नियुक्ती करण्यापूर्वी शासनामार्फत सक्षम प्राधिका-याकडून तपासून घेण्यात येतील. विहित शारीरिक पात्रता नसल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी अपात्र ठरेल. परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशप्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर (https://mpsconline.gov.in) उपलब्ध आहे.
उमेदवारांच्या प्रोफाईलद्वारे परीक्षेपूर्वी सर्वसाधारणपणे ७ दिवस अगोदर उपलब्ध करुन देण्यात येईल, त्याची प्रत परीक्षेपूर्वी डाऊनलोड करुन घेणे व परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणामुळे विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वीपणे करणे शक्य न झाल्यास अर्ज ( करण्याच्या अंतिम दिनांकानंतर दोन दिवसापर्यंत परीक्षाशुल्काचा भरणा ऑफलाईन पद्धतीने करण्याकरीता चलनाची प्रत घेता येईल. सदर जाहिरात आयोगाच्या https://mpsc.gov.in तसेच https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 4 नोव्हेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.