पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (MSF – महाराष्ट्र राज्य सुरक्षा दल) येथे ऑफिस असिस्टंट आणि कॉम्प्युटर टेक्निशियन ही एकूण 07 पदे भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ व्दारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी २५ व कमाल ४० वर्षापेक्षा अधिक नसावे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 25,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज करायचा आहे. निवडलेल्या उमेदवारास महामंडळाच्या अटी व शर्तीसह नियुक्ती पत्र दिले जाईल. दिली जाणारी नियुक्ती ही करार पध्दतीने कंत्राटी तत्वावर ०१ वर्षासाठी असेल व महामंडळाची आवश्यकता आणि प्रस्तुत कर्मचाऱ्यांची क्षमता, आत्मसात केलेले ज्ञान व इतर निकष यानुसार करार नुतनीकरण करण्यात येईल. मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल. मुलाखतीवेळी उमेदवारांनी सादर करावयाची कागदपत्रे : १) वैयक्तिक माहिती (BIO-DATA), २) शैक्षणिक कागदपत्रे, ३) अनुभव प्रमाणपत्र, ४) Tally प्रमाणपत्र, ५) ०२ पासपोट साईज आकाराचे फोटो/ पॅन कार्ड / आधार कार्ड.
प्रस्तुत जाहिरातीत नमुद करण्यात आलेली पदसंख्या यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सदर निवड प्रक्रिया कोणत्याही वेळी / कोणत्याही कारणास्तव / कोणत्याही टप्यावर / पुर्णतः किंवा अंशतः रद्द करण्याचा / फेरबदल करण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई यांचेकडे राखून ठेवण्यात आलेला आहे. उमेदवारांच्या नेमणुकीबाबत अंतिम निर्णय महामंडळाचा असेल. सविस्तर जाहिरात व अधिक माहिती करिता maharashtra.gov.in वेबसाईटला भेट द्यावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2024 ही आहे. अधिक माहितीसाठी वरील pdf जाहिरात वाचून घ्या.